Covid परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; काँग्रेस खासदारांचा घरचा आहेर

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असलं तरी सर्वच सत्तेतील प्रमुखांनी घतलेले निर्णय सर्वाना मान्य असतात असं नाही. शिवसेनेसह आता काँग्रेसमध्ये देखील काही नेते नाराज असल्याचं दिसत आहे.
Covid परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; काँग्रेस खासदारांचा घरचा आहेर
Covid परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; काँग्रेस खासदारांचा घरचा आहेरSaam TV

चंद्रपूर : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असलं तरी सर्वच सत्तेतील प्रमुखांनी घतलेले निर्णय सर्वाना मान्य असतात असं नाही. शिवसेनेसह आता काँग्रेसमध्ये देखील काही नेते नाराज असल्याचं दिसत आहे. अशातच आता राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधाविरोधात काँग्रेसचे (Congress) एकमेव खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी राज्य सरकारवर टीका केली करत काँग्रेससह राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Covid परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी; काँग्रेस खासदारांचा घरचा आहेर
PM Narendra Modi: भारताकडे दोन शक्ती लोकसंख्या आणि लोकशाही, जगानेही हे स्विकारलं - मोदी

राज्यातील पर्यटनस्थळे (Tourist places) बंद करण्याच्या राज्य सरकारच्या (MVA) निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून हा निर्णय मागे घेण्याची मागणीही काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे राज्यासह देशातील सर्व पर्यटनस्थळे आणि व्याघ्र प्रकल्प सुरू ठेवायला हवी आणि यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले आहे. कोविड परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. किती दिवस लोकांनी निर्बंधात राहायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com