'BJP आणि RSS ने ओबीसीच खच्चीकरण केलं असं मत ओबीसींच झालं आहे'

भाजप आणि RSS ने ओबीसीच खच्चीकरण केलं असं मत ओबीसीच झालं आहे. ओबीसीच्या विकासासाठी महामंडळ दिले पण त्यास निधी दिला नसल्याने त्याचा विकास झाला नाही.
'BJP आणि RSS ने ओबीसीच खच्चीकरण केलं असं मत ओबीसींच झालं आहे'
'BJP आणि RSS ने ओबीसीच खच्चीकरण केलं असं मत ओबीसींच झालं आहे'Saam TV

राज्यातील OBC नेते फसवेगिरीच राजकारण करत असून नेमकं ओबीसीबद्दल काय झाले यावर नागरिकांना काहीच सांगत नाहीत यासाठी ओबीसी लोकांनी सावध राहील पाहिजे असा सल्ला बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे आज ते लातुरात बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आयोजित ओबीसी मेळाव्या निमित्त बोलत होते.

राज्यातील ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) असो की सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) असो मागासवर्ग आयोगाचा ओबीसी चा अहवाल राज्य शासनाला मिळाला तो सर्वोच्च न्यायालयात दाखल केला की नाही तो स्वीकारला की नाही याबद्दल बोलायला तयार नाहीत. सर्व फसवेगिरीच राजकारण सुरू असून यापुढे ओबीसीच स्टेटर्जी काय असावी याबद्दल चर्चा होऊन ओबीसीचं यापुढच मतदान फक्त आरक्षणावाल्यांना राहील असा मेळाव्यात ठरल्याचे आंबेडकर यांनी सांगितले आहे.

'BJP आणि RSS ने ओबीसीच खच्चीकरण केलं असं मत ओबीसींच झालं आहे'
दुर्दैवी : Valentine's Day दिवशी पतीला आणण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय पत्नीचा ट्रॉलीच्या धडकेत जागीच मृत्यू

भविष्यात OBC च्या पोटजाती विकासासाठी आरक्षणाची मागणी करतील त्यासाठी धरणे आंदोलन, मोर्चे काढून मागण्या मांडतील असा ठराव या मेळाव्यात करण्यात आला असून भाजप आणि RSS आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहोत असं दाखवलं जात पण BJP आणि RSS यांनी ओबीसीच खच्चीकरण केलं अस मत ओबीसीच झाले आहे ओबीसीच्या विकासासाठी महामंडळ दिले पण त्यास निधी दिला नसल्याने त्याचा विकास झाला नाही त्यांचा बघण्याचा रोख मुसलमानाकडे आहे पण अत्याचाराचा रोख ओबीसीवर आहे असा प्रचार OBC करत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे असं मत अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.

हे देखील पहा -

महिला अथवा विद्यार्थिनीनी कोणता ड्रेस कोड असावा असं बंधन आणता येत नाही हिंदू मुलींनी मुस्लिम मुलीच्या बाजूने उभ्या राहिल्या त्याच स्वागत आपण करत असून सध्याला अनेकजण धुळीच्या ऍलर्जीमुळे चेहऱ्यावर कापड बांधतात मुस्लीम मुलीच्या हिजाबमुळे (Hijab) इतरांना त्रास होत नसल्याने त्यावर बंधने असू नये असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com