दुर्दैवी : Valentine's Day दिवशी पतीला आणण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय पत्नीचा ट्रॉलीच्या धडकेत जागीच मृत्यू

मुंबईवरून येणाऱ्या आपल्या पतीला आणण्यासाठी जात असताना आणि आज व्हॅलेंटाईन डे असताना या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुर्दैवी : Valentine's Day दिवशी पतीला आणण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय पत्नीचा ट्रॉलीच्या धडकेत जागीच मृत्यू
दुर्दैवी : Valentine's Day दिवशी पतीला आणण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय पत्नीचा ट्रॉलीच्या धडकेत जागीच मृत्यूदिलीप कांबळे

मावळ : मावळमधील तळेगाव चाकण (Talegaon Chakan) रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक बसून एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मसिरा अझरुद्दीन मोमीन असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या महिलेचे नाव आहे.

मसिरा मोमीन (Masira Momin) या दुचाकीवरून आपल्या पतीला उर्से टोल नाक्यावर आणण्यासाठी जात असताना तळेगाव चाकण रस्त्यावर त्यांना उसाच्या ट्रॉलीने धडक दिली. त्यात मसिरा या रस्त्यावर पडल्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र दुर्दैवी बाब म्हणजे मसीरा या जखमी अवस्थेत सुमारे अर्धा तास रस्त्यावर पडून होत्या. मुंबईवरून येणाऱ्या आपल्या पतीला आणण्यासाठी जात असताना आणि आज व्हॅलेंटाईन डे असताना महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade police) भेट देत पंचनामा (Panchnama) केला आणि तात्काळ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com