एक लाख ST कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?.. राज ठाकरेंचा सरकारला सवाल

'ST मधला भ्रष्टाचार थांबत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही...'
एक लाख ST कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?.. राज ठाकरेंचा सरकारला सवाल
एक लाख ST कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?.. राज ठाकरेंचा सरकारला सवालSaamTV
Published On

नाशिक : राज ठाकरे (Raj Thackeray) आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत तसंच ते पुढचा दौरा विदर्भ, कोकण या ठिकाणी दौरा करणार आहेत, सध्या पक्ष बांधणी सुरु असल्याचं त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंना ST कर्मचाऱ्यांच्या संपावरती प्रश्न विचारला असता ते म्हणाले. 'एसटी कर्मचाऱ्यांच्या संप हा सर्व युनियन बाजूला सारून कर्मचारी एकत्र आलेला हा संप आहे, तुमच्याकडे लोकांनी राज्य दिलंय ते अरेरावी करण्यासाठी नाही असा टोला त्यांना आघाडी सरकारला लगावला.

हे देखील पहा -

ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र -

तसंच एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी विनापगार गेली, ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती देखील राज य़ांनी यावेळी दिली. शिवाय एसटी मधला भ्रष्टाचार थांबत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही असही ते यावेळी म्हणाले. शिवाय या कर्मचाऱ्यांवरती अरेरावी करण्यापेक्षा संवादातून मार्ग काढा 1 लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला ST कर्मचाऱ्यांनाही कुटुंब आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार का? असही राज ठाकरे म्हणाले.

तोपर्यंत हे असंच सुरू राहणार -

एक लाख ST कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?.. राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Pune : SRPF च्या परीक्षेत भावाच्या जागेवरती पेपर देणाऱ्या तरुणाला अटक !

दरम्यान राज्यात परीक्षांचे सुरु असणारे घोळ याबाबत विचारलं असता ते म्हणाले 'या गोष्टी जोपर्यंत लोकं मनावर घेणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही, लोकं ऐनवेळी मतदान कुणाला करतात जोपर्यंत मतपेटीतून जनता यांना उत्तर देत नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार आत्ता चिडायच आणि निवडणूकीला भलत्याच विषयांवरती मतदान (Voting) करणार असाल तर कसं हे सुधारणार त्यामुळे परिस्थिती सुधारणार नाही.

ज्या त्रासातून पाच वर्ष काढली ते लोक विसरतात हे राज्यकर्त्यांना माहिती आहे ते मुळेच ते असं वागतात त्यामुळे नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, तर सुज्ञ ही असावं लागतं असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com