डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पादपीठाचे काम पूर्णत्वाकडे - धनंजय मुंडे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इंदूमिल स्मारक कामाची पाहणी केली.
Dhananjay Munde And Varsha Gaikwad
Dhananjay Munde And Varsha Gaikwadsaam tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई : मुंबईतील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr Babasaheb Ambedkar) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे सनियंत्रण व काम वेगाने पूर्ण व्हावे,यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी इंदूमिल स्मारक कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा (Dr Babasaheb Ambedkar statue) ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, त्याठिकाणी पादपीठाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती देखील लवकरच अंतिम करण्यात येणार आहे, अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी केली असून केलेल्या कामाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांचे सहकारी उभारत आहेत. या प्रतिकृतीची मंत्रिमंडळाने नेमलेल्या उपसमितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन नुकतीच पाहणी केली होती व त्या प्रतिकृती मध्ये काही बदल सुचवले होते. त्यानुसार नवीन बदलांसह शिल्पकार अनिल सुतार यांनी प्रतिकृतीबाबतचे सादरीकरण केले. ही प्रतिकृती लवकरच अंतिम करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Dhananjay Munde And Varsha Gaikwad
देहूतील देवस्थानचा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

यावेळी मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम,राज्यमंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, शिल्पकार अनिल राम सुतार,समीर अनिल सुतार, संजय पाटील, आर्किटेक्ट शशी प्रभू, इतिहासतज्ज्ञ डॉ.आर मालाणी, सर जेजे आर्ट स्कुलचे प्रा. विश्वनाथ सहारे आदी उपस्थित होते.

हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने त्याला पूरक असा दर्जा सांभाळून काटेकोरपणे यंत्रणांनी खरबदरी घ्यावी, असेही धनंजय मुंडे म्हणाले.हे स्मारक भविष्यात जगभरात ओळखले जावे,यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी,विषयतज्ज्ञ,सर्व पक्षीय नेते यांसह विविध मान्यवरांच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल,असेही मुंडे म्हणाले.दरम्यान समुद्र किनाऱ्याचे वातावरण, वातावरणातील होणारे बदल,पावसाळ्यात कामाची गती आदी बाबी विचारात घेऊन दैनंदिन कामांचा चार्ट बनवून त्यावर अंमल करावा, अशा सूचना यावेळी मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com