देहूतील देवस्थानचा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देहूतील कार्यक्रम वादळी आणि राजकीयदृष्टीने वादग्रस्त ठरला.
Narendra Modi
Narendra ModiSaam TV
Published On

मावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा देहूतील कार्यक्रम वादळी आणि राजकीयदृष्टीने वादग्रस्त ठरला. देहूत शिवसेनेचे स्थानिक खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) तसेच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) हे अनुपस्थित असल्याने मावळ मध्ये मोठी राजकीय चर्चा रंगली. त्या चर्चेच आणखी भर पडली ती राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. पवार यांना भाषण करु न दिल्याने देहुतील पंतप्रधांनांच्या कार्यक्रमात राजकीय तर्क वितर्कांचा धुरळा उडाला.

Narendra Modi
फक्त आडनाववरून OBC डेटा गोळा करणं चुकीचं; मंत्री छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, देहु संस्थानचा हा कार्यक्रम भाजपाने हायजक केला. ताल वक्तव्य करणाऱ्या आचार्य तुषार भोसले यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली. परंतु, स्थानिक आमदार, खासदार आणि शहरातील प्रथम नागरिकांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाने जानून बुजून स्थानिकांना महत्व न देता केवळ भाजपाच्या नेत्यांना महत्व दिले, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलीय.

Narendra Modi
संभाजी महाराज आपल्या हृदयात, त्यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असावे; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आमदार सुनिल शेळके यांच्या वक्तव्याचा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी समाचार घेतला आहे. भेगडे यांनी शेळके यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अजित पवारांना भाषण करायला लावायचे की नाही,हा संपूर्ण अधिकार देहू संस्थानचा आहे.तर देहू संस्थाननेही या आरोपांचं खंडन केलं आहे. नरेंद्र मोदींचा दौरा दिल्लीवरुन असल्याने आम्हाला त्याबाबत काहीच माहीत नाही, अशी प्रतिक्रिया नितीन महाराज मोरे यांनी दिलीय.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com