अहवाल आल्यावर राज्यसरकार अंतिम मदत जाहीर करेल : शरद पवार

नैसर्गिक आपत्तीतील (Natural disasters) १६ हजार बाधित कुटुंबांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे (Nationalist Welfare Trust) मदत दिली जाणार आहे
अहवाल आल्यावर राज्यसरकार अंतिम मदत जाहीर करेल : शरद पवार
अहवाल आल्यावर राज्यसरकार अंतिम मदत जाहीर करेल : शरद पवार saam tv news

राज्यातील सात जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. राज्यसरकार पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन अंतिम मदत जाहीर करेल. याबाबत कालच मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. राज्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यासोबत त्यांनी राष्ट्रवादीकडून मदतीची घोषणाही केली आहे. (State government will announce final help after receiving the report: Sharad Pawar)

अहवाल आल्यावर राज्यसरकार अंतिम मदत जाहीर करेल : शरद पवार
राज्याच्या मदतीसाठी पंतप्रधानाचा एक-दोन हजार कोटींचा चेक आणावा

महाराष्ट्राला अशा संकटांचा सामना करण्याचा अनुभव आहे. लातूर भूकंप झाला त्यावेळी एक किमी अंतरावर आम्ही पुनर्वसन केले. मात्र आता राज्यातील सात जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसला आहे. अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनेने तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सर्व नुकसानीचा राज्यसरकार आढावा घेत आहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. दोन तीन दिवसांत संपूर्ण आढावा घेऊन राज्यसरकार अहवाल तयार करून अंतिम घोषणा करेल. अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे या जिल्ह्यातील १६ हजार कुटुंबांचे नुकसान झाले आहे. या सर्व कुटुंबांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे मदत दिली जाणार आहे. या सर्व बाधित कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. यात भांडी, पांघरूण, मास्क, अन्नपदार्थांचे वाटप केले जाणार आहे. यासोबतच आपत्तीग्रस्त भागात राष्ट्रवादीकडून वैद्यकीय पथकेही पाठवली जाणार असल्याचे शरद पवार य़ांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. ते केंद्राकडून नक्कीच भरीव मदत आणतील, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांना टोलाही लगावला आहे. तसेच, नेत्यांनी आपत्तीग्रस्त भागाचे दौरे टाळावेत, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com