राज्याच्या मदतीसाठी पंतप्रधानाचा एक-दोन हजार कोटींचा चेक आणावा

प्रत्येकाने मनापासून, महाराष्ट्र (Maharashtra) आपला आहे, कोकण (Kokan) आपला आहे, सातारा (Satara) सांगलीतील (Sangali) माणसे आपली आहे, प्रत्येकाला असं वाटतंय की आपण मदत करावी
राज्याच्या मदतीसाठी पंतप्रधानाचा एक-दोन हजार कोटींचा चेक आणावा
राज्याच्या मदतीसाठी पंतप्रधानाचा एक-दोन हजार कोटींचा चेक आणावा Saam Tv news
Published On

मुंबई : महाराष्ट्रातले (Maharashtra) काही मंत्री केंद्रामध्ये (Central Government) आहे. त्यांनी काही घोषणा केलेली आहे. त्यांनी येताना महाराष्ट्राच्या आपत्तीग्रस्त जनतेसाठी केंद्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednar Modi) सही असलेला एक-दोन हजार कोटीचा चेक घेऊन यावा. जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा सांगलीच्या जनतेला सुपूर्त करु.अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीवर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. (They should bring a check of crores of rupees from the Prime Minister to help the state)

राज्याच्या मदतीसाठी पंतप्रधानाचा एक-दोन हजार कोटींचा चेक आणावा
डाेंगरास भेगा; फणसवाडीसह 100 घरांना धाेका; गावकरी धास्तावले

महाराष्ट्र सरकार सक्षम आहे, आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत. पण केंद्राची जबाबदारी आहे, महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देते, विशेषतः मुंबई. आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही. पण केंद्र आमचा बाप आहे. असेही संजय राऊच यांनी म्हटले आहे.

जगभरात ज्या वेळी अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळी बचावकार्यात अडथळे येऊ नये हा नियम आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर अशा काही घटना घडतात तेव्हा शक्‍यतो आरोप-प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवर आरोप करणे हल्ले करणे हे थांबले पाहिजे,

प्रत्येकाने मनापासून, महाराष्ट्र आपला आहे, कोकण आपला आहे, सातारा सांगलीतील माणसे आपली आहे, प्रत्येकाला असं वाटतंय की आपण मदत करावी, आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा, ही काही श्रेयाची लढाई नाही, हा श्रेयवाद नाही, जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणुसकीशून्य काम करत आहेत.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com