SSC Board Exam: उद्यापासून मेट्रिकची परीक्षा; १६ लाख विद्यार्थी देणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा

10th SSC Board Exam: राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार आहेत . मेट्रिकच्या परीक्षेसाठी शाळांनी तयारी केलीय.
 SSC Board Exam
SSC Board Examsaam tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं वळण म्हटलं जाणाऱ्या दहावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहेत. राज्यात दहावीचे १६ लाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या २३ हजारांहून अधिक शाळांनी तयारी केलीय.

दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी राज्यात ५१३० केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून येतील, त्या केंद्रांची परीक्षा मान्यता कायमची रद्द केली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीय. परीक्षा काळात गैरप्रकराना आळा बसावा यासाठी २७१ भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर ११ नंतर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार नाहीये.

 SSC Board Exam
लेकीच्या बर्थडेला 'छावा' चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक, कोल्हापुरातल्या बापाची अख्ख्या पंचक्रोशीत चर्चा

राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसणार आहेत. यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल पुणे विभागातून दोन लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर सर्वात कमी कोकण विभागात २७ हजार विद्यार्थी संख्या आहे. दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरळीत आणि कॉपी मुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर उपाय योजना करण्याचे ठरवले आहे.

 SSC Board Exam
CBSE New Rule: दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत

राज्यातील ७०१ ठिकाणी केंद्रावर काम करणारा स्टाफ बदलण्यात येणार आहे. या दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख 80 हजार मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी परीक्षा घेणारा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात येणार आहे.

पुणे 139

नाशिक 93

नागपूर 86

मुंबई 18

कोल्हापूर 54

कोकण 0

लातूर 59

या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com