श्रीपूर - महाळुंग नगर पंचयातींसाठी BJP - NCP मध्ये लढत; तर भाजपची तिसरी आघाडी‌ही मैदानात
श्रीपूर - महाळुंग नगर पंचयातींसाठी BJP - NCP मध्ये लढत; तर भाजपची तिसरी आघाडी‌ही मैदानातSaamTV

श्रीपूर - महाळुंग नगर पंचयातींसाठी BJP - NCP मध्ये लढत; तर भाजपची तिसरी आघाडी‌ही मैदानात

भाजप विरुध्द राष्ट्रवादी (BJP vs NCP) यांच्यामध्ये थेट लढत होत असली तरी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे.
Published on

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते, माढा,वैराग व श्रीपूर - महाळुंग या पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. दरम्यान पाच नगरपंचायती पैकी श्रीपूर - महाळुंग नगरपंचयातीच्या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे (Solapur District) लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी भाजप विरुध्द राष्ट्रवादी (BJP vs NCP) यांच्यामध्ये थेट लढत होत असली तरी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (MLA RanjitSingh Mohite Patil) यांनी या निवडणुकीत स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे येथे भाजपमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले आहे.

श्रीपूर - महाळुंग नगर पंचयातींसाठी BJP - NCP मध्ये लढत; तर भाजपची तिसरी आघाडी‌ही मैदानात
नाशिक जिल्ह्यात 6 नगर पंचायतीच्या 87 जागांसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी ?

दरम्यान येथील नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणुक होत असून निवडणुकीत 13 जागांसाठी 84 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे 13, राष्ट्रवादी 13,शिवसेना 7,वंचित 3 आणि रिपाई 1 जागेवर लढत आहे. याशिवाय मोहिते पाटीलांनी सर्व 13 जागांवर आपले अपक्ष उमेदवार उभे केले आहेत.

हे देखील पहा -

त्यामुळे श्रीपूर - महाळुंग (Sripur - Mahalung) निवडणुकीत भाजप विरुध्द भाजप (BJP vs BJP) असा ही अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. येथील निवडणूकीसाठी भाजपकडून माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे प्रयत्न आहेत तर राष्ट्रवादीकडून आमदार बबनदादा शिंदे हे प्रय़त्न करत आहेत.

अपक्ष उमेदवारांसाठी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत भाजपमध्येच दोन गट पडल्याचे समोर आले आहे. मतविभागाणीचा नेमका कोणाला फटका बसतोय आणि फायदा कोणाला होतोय हे निवडणुक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com