Special Report : पिळदार शरीरासाठीची औषधही घातक; मेफेंटरमाईन सल्फेट आणि स्टेरॉईडमुळे हृदयविकाराचा धोका

Heart Attack : अलिकडे शरीर कमावण्याच्या वेडापायी अनेकजण सर्रासपणे सप्लिमेंट आणि स्टेरॉइड्स घेऊ लागले आहेत. मात्र हीच औषधं आता जीवावर उठू लागली आहेत. स्टेरॉईडमुळेही हृदयविकार तसच किडनी विकार होऊ शकतो.
Protein and Steroid
Protein and SteroidSaam Digital

मयुरेश कडव, साम टीव्ही प्रतिनिधी

पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अलिकडे शरीर कमावण्याच्या वेडापायी अनेकजण सर्रासपणे सप्लिमेंट आणि स्टेरॉइड्स घेऊ लागले आहेत. मात्र हीच औषधं आता जीवावर उठू लागली आहेत. हे आम्ही का सांगतोय, पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट..

पिळदार शरीर, उत्तम आरोग्यासाठी हल्ली सर्वच तरूणाई जिममध्ये जाऊ लागलीय. सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम तर हवाच..मात्र झटपट शरीर कमावण्याच्या हव्यासापोटी बरेच जण प्रोटीन, स्टेरॉईड अशा सप्लिमेंट घेऊ लागलेत. हे कमी होतं म्हणून की काय पिळदार शरीर बनवावयाचे असेल तर काही जिम चालकांकडून व्यायाम करताना ऊर्जा मिळावी यासाठी मेफेंटरमाईन सल्फेट यासारख्या औषधांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो मात्र, त्यातून हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. गुरुवारी पुण्यातील एका जिमवर पोलिसांनी छापा टाकत काही प्रतिबंधित औषधे आणि इंजेक्शन जप्त केले. यातून तरूणाईला अशा घातक औषधांचं किती वेड लागलंय हे दिसून येतं.

मेफेंटरमाईन औषधाच्या अतिसेवनानं हृदयाविकाराचा झटका येऊ शकतो. शरीराचे स्नायूही एकदम ताणले जातात तसेत ते आकसतात. यातून हृदयरोग, पक्षाघात अशा प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. स्टेरॉईडमुळेही हृदयविकार तसच किडनी विकार होऊ शकतो. प्रोटीनच्या अतिरिक्त सेवनानं हाडं खिळखिळी होऊ शकतात. या सप्लिमेंटचे दुष्परिणाम लक्ष्यात घेता तज्ञांनीही या घातक गोष्टीपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.

Protein and Steroid
Rain Alert : पुढच्या काही तासात या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा; कोकण कोल्हापूरमधील जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांत प्रोटिनच्या अतिरिक्त सेवनामुळे तसच स्टेरॉइडमुळे तरुणांचा बळी गेल्याच्या घटना सातत्याने समोर येतायत. मात्र यातून ना तरुणाईने धडा घेतलेला नाही ना जिम चालकांनी. त्यामुळे आता प्रशासनालाच कठोर पावलं उचलावी लागतील. अन्यथा पिळदार शरीरयष्टी कमावण्याच्या नादापायी एक अख्खी पिढीच बरबाद होईल.

Protein and Steroid
Devendra Fadnavis : वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची चांदी; मूळ वेतन, भत्त्यांमध्ये मोठी वाढ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com