Rain Alert : पुढच्या काही तासात या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा; कोकण कोल्हापूरमधील जनजीवन विस्कळीत

IMD Rain Alert : भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे .
Rain Alert
Rain Alert Saam Digital
Published On

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. काही नद्यांना पूरही आला असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्यातचं भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे .

यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राच्या बाहेर पडलेली आहे. कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी घाटमाथ्यावर मात्र पाऊस जोरदारपणे कोसळत आहे. म्हणूनच पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली. सध्या पंचगंगा नदी ही 29 फुटांवरून वाहत आहे.. जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.. त्यामुळे धोकादायक मार्गांवरून वाहतूक करू नये अशा पद्धतीचे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

रत्नागिरी - चिपळूणच्या कालूस्ते घाटात दरड कोसळून माती रस्त्यावर आली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूण कोंडे करंबवणे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माती आली आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं माती बाजूला कारण्याचं काम सुरु झालं आहे. माती रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा ठरत आहे.मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी, वेताळबाबर्डे, व पणदुर भागात महामार्गावर पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे मुंबई व गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या अडकल्या आहेत. महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.

महाडमध्ये ढगफुटी

महाड तालुक्यातील वाळण विभागात ढगफुटी झाली आहे. काळ नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. सांदोशी बौद्धवाडी आणि वाघोली गावाला जोडणारा रस्ता गेला वाहून गेला आहे.

Rain Alert
Devendra Fadnavis : वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची चांदी; मूळ वेतन, भत्त्यांमध्ये मोठी वाढ

वर्ध्यात पावसामुळे उड्डाणपुलाच गर्डर लॉंचिंग थांबवल

मुसळधार पावसामुळे रद्द झाला वर्धा येथील उड्डाणपुलाच गर्डर लॉंचिंग थांबावण्यात आलं. दुपारपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस असल्याने रेल्वेचा मेगा ब्लॉकही रद्द करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून बजाज चौकाच्या उड्डाणपुलाचं गडर लॉंचिंग रखडलं आहे. सर्वांजनिक विभाग आणि रेल्वे विभागाकडून गडर लॉंचिंगची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र आज पावसाचा रेड अलर्ट असल्याने मेगा ब्लॉक पुढे ढकलण्यात आला आहे.

Rain Alert
Chhatrapati Sambhajinagar : भरधाव कारने दुचाकीला उडवलं; पती पत्नीचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com