कळंबू येथील जवान निलेश महाजन यांना वीरमरण; गोळी लागून जखमी, उपचारादरम्‍यान मृत्‍यू

कळंबू येथील जवान निलेश महाजन यांना वीरमरण; गोळी लागून जखमी, उपचारादरम्‍यान मृत्‍यू
कळंबू येथील जवान निलेश महाजन यांना वीरमरण; गोळी लागून जखमी, उपचारादरम्‍यान मृत्‍यू
Published On

नंदुरबार : कळंबू (ता. शहादा) गावचे सुपुत्र असलेले निलेश अशोक महाजन यांना मणिपूर येथे कर्तव्य बजावत गोळी लागली होती. त्‍यांच्‍यावर उपचार सुरू असताना शनिवारी (ता. २४) रात्री साडेआठच्‍या सुमारास वीरमरण आले. ते (कै.) अशोक जगन्नाथ महाजन यांचे चिरंजीव होते. (soldier-nilesh-mahajan-death-treatment-manipur-gun-shoot)

मणिपूर येथे कर्तव्य बजावत असतांना ६ नोव्हेंबर २०२० रोजी ते गोळी लागून गंभीर जखमी झाले होते. सहकाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी गुहाटी येथे दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ महिन्‍यांपासून उपचार सुरू असतांना शनिवारी (ता. २४) रात्री साडेआठच्‍या सुमारास प्रकृती अधिक खालावल्याने वीरमरण आले. शहिद निलेश यांचे बालपण व शिक्षण कळंबू येथे झाले होते.

वडील व काकाही होते सैन्‍यदलात

वडील व लहान काका सैन्यदलात असल्याने त्याला देशसेवा करण्याची लहानपणापासून आवड होती. मात्र कमी वयातच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी आईचेही निधन झाल्याने तिघां भावंडांचा आधार गेला. अतिशय कमी वयात आई– वडिलांचे छत्र हरपले; त्यानंतर दोघ भावंडांनी निलेश यांच्या शिक्षणासाठी मदत केली.

कळंबू येथील जवान निलेश महाजन यांना वीरमरण; गोळी लागून जखमी, उपचारादरम्‍यान मृत्‍यू
रिमझिम पावसाने भिंत कोसळली; चार वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू

२६ व्‍या वर्षीच वीरमरण

निलेशचे प्राथमिक शिक्षण कळंबू येथील जि. प. मराठी शाळेनंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथील डी. जी. बी. शेतकी विद्यालयात होऊन पुढे दोंडाईचा येथील दादासाहेब रावल कॉलेज येथे एनसीसीच्या तीन वर्षांच्या शिक्षणानंतर नांदेड येथे आर्मी पायु मराठा युनिटमध्ये २०१६ मध्ये कमी वयात २१ व्या वर्षी भरती झाले. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६ रोजी बेळगांव (कर्नाटक) येथे पुढील प्राशिक्षण पूर्ण करून सुरुवातीला दिल्ली येथे रुज्जू झाले. त्यानंतर मणिपूर येथे सेवा बजावली पाच ते साडेपाच वर्षाच्या सेवा बजावल्या नंतर वयाचे २६ व्या वर्षी वीरमरण आल्याने कळंबू गावावर शोककळा पसरली आहे. निलेश यांच्या पच्यात एक विवाहित बहिण सीमा महाजन व मोठा भाऊ दिपक महाजन आहे.

कळंबू येथील जवान निलेश महाजन यांना वीरमरण; गोळी लागून जखमी, उपचारादरम्‍यान मृत्‍यू
चेक पोस्‍टवर वाहतूक परवाना काढून देण्यासाठी लाचेची मागणी; दोघांच्‍या आवळल्या मुसक्या

उद्या अंत्‍यसंस्‍कार

शाहिद निलेश यांचे पार्थिव गुहाटी येथून विमानातून आज (ता.२५) रात्री उशिरापर्यंत धुळे येथे येण्याचा अंदाज असून, धुळे येथून उद्या (ता. २६) शासकीय वाहनाने सोनगीर येथील राजकुमार नगरातील राहत्या घरून अंत्ययात्रा काढून शासकीय इतमामात दोंडाईचा रस्त्यावरील सोमेश्वर महादेव मंदिराजवळ स्वामी नारायण मंदिराच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार पडतील, असे शाहिद निलेश यांचा मोठा भाऊ दिपक महाजन व नातेवाईक शैलेश देवरे यांनी कळविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com