चेक पोस्‍टवर वाहतूक परवाना काढून देण्यासाठी लाचेची मागणी; दोघांच्‍या आवळल्या मुसक्या

चेक पोस्‍टवर वाहतूक परवाना काढून देण्यासाठी लाचेची मागणी; दोघांच्‍या आवळल्या मुसक्या

वाहतूक परवाना काढून देण्यासाठी लाचेची मागणी; दोघांच्‍या आवळल्या मुसक्या
Published on

धुळे : आरटीओ चेक पोस्टमधून ओडिसी वाहतूक परवाना काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत विभागाने मुसक्या आवळल्या. (dhule-news-Demand-for-a-bribe-to-remove-a-transport-license-action-dhule-acb)

आरटीओ चेक पोस्ट हाडाखेड येथून ओडिसी वाहतूक करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी दोघा इसमांनी पैशांची मागणी केली. चेक पोस्‍टवर वाहतूक परवानगीसाठी शासकीय चार हजार रुपये असताना एजंट असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बारा हजार रुपये देऊन तात्काळ परवानगी मिळवून देण्याचे सांगितले. या संदर्भातील माहिती तक्रारदाराने तात्‍काळ लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितली. या माहितीनुसार लाच लुचपत विभागातर्फे सापळा रचला. वाहतूकीची परवानगी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराला सांगितल्‍यानुसार बारा हजार रूपये देत होता. यावेळी दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

चेक पोस्‍टवर वाहतूक परवाना काढून देण्यासाठी लाचेची मागणी; दोघांच्‍या आवळल्या मुसक्या
धुळे जिल्ह्यात धरणांमध्ये पाणीसाठा खालवला; पावसाची समाधानकारक हजेरी नसल्‍याचा परिणाम

एजंटांचा सुळसुळाट

चेक पोस्‍टवर एजंटांचा कायम वावर असतो. वाहन धारकांकडून अनधिकृत पैसे घेवून परवानगी मिळवून देत असतात. मात्र आजच्‍या लाच लुचपत विभागाच्या या कारवाईनंतर आरटीओ चेक पोस्ट हाडाखेड येथे ओडिसी वाहतूक करण्याची परवानगी संदर्भात एजंटगिरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com