सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खामितकर निलंबित

चुकीचे काम करण्याची सवय आणि शासकीय अधिकाऱ्यांना अशोभनीय वर्तन असल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात असल्याचे आदेशात बकोरिया यांनी स्पष्ट केले आहे.
solapur zilla parishad samaj kalyan vibhag adhikari sumit khamitkar
solapur zilla parishad samaj kalyan vibhag adhikari sumit khamitkar saam tv

Solapur Zilla Parishad News :

सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे (solapur zilla parishad samaj kalyan vibhag) जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर (sumit khamitkar) यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्याबाबतचा आदेश पुणे विभागीय समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी काढला आहे. निलंबन कालावधीत खमितकर यांना प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग पुणे येथे मुख्यालय देण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्तावित केल्यानुसार खमितकर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत, आढावा बैठकीस वारंवार विनापरवानगी अनुपस्थित राहणे, सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात न घेणे तसेच त्यांचे काम असमाधानकारक असणे. याबाबत मसुदा शासनास सादर करण्यात आला होता.

solapur zilla parishad samaj kalyan vibhag adhikari sumit khamitkar
Dodamarg News: दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

खमितकर यांच्या कामकाजात अनुषंगाने विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra News)

दरम्यान जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना खमितकर यांच्या प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटींच्या अनुषंगाने तसेच वारंवार चुकीचे काम करण्याची सवय आणि शासकीय अधिकाऱ्यांना अशोभनीय वर्तन असल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याबाबत शासनास प्रस्तावित करण्यात असल्याचे आदेशात बकोरिया यांनी स्पष्ट केले आहे.

solapur zilla parishad samaj kalyan vibhag adhikari sumit khamitkar
Madha Lok Sabha Constituency : माेहिते पाटील 'माढा'त शिवसैनिकांना करु लागले आपलसं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देणार शह?

सोलापूर जिल्हा परिषदेत अनुदान वाटपात चालढकल केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सुनील खमितकर यांनी विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय आठ दिवसांत रक्कम न भरल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

solapur zilla parishad samaj kalyan vibhag adhikari sumit khamitkar
Crime News : मुंबई विमानतळावर 3 किलो सोने, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर 40 किलो अफू जप्त; तिघांना अटक (video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com