Solapur : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण!

अतिवृष्टीने ठिकठिकाणी ओढे-नाले तुडुंब वाहताना दिसत आहेत. तालुक्यातील धसपिंपळगाव येथील ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी एका तरुणाचे प्राण वाचवले असून त्याची दुचाकी मात्र पाण्यात वाहून गेली आहे.
Solapur : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण!
Solapur : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण!विश्वभूषण लिमये
Published On

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर अन् तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु असून आज ही दिवसभर पाऊस सुरूच आहे. आज सुर्यदर्शन झाले नसून शेतातील उभ्या पिकांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. आज दोन दिवसांत 71 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीने ठिकठिकाणी ओढे-नाले तुडुंब वाहताना दिसत आहेत. तालुक्यातील धसपिंपळगाव येथील ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी एका तरुणाचे प्राण वाचवले असून त्याची दुचाकी मात्र पाण्यात वाहून गेली आहे. अबुझर बासित सौदागर असे या युवकाचे नाव असून, ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी दोरी टाकून वाहत्या पाण्यातून त्याला बाहेर काढले आहे.

हे देखील पहा :

अबुझर सौदागर याचा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून जनावरे खरेदीसाठी जात असताना बार्शी-धसपिंपळगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्याच्या पुलावरुन पाणी वाहत होते. तरी देखील त्याने धाडस करून दुचाकी पाण्यातून नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या वेगाने आणि ओढीमुळे तो दुचाकीसह वाहून गेला. ओढ्याच्या पुढे असलेल्या दगडाला त्याने पकडून ठेवले अन् उभा राहिला सुटकेसाठी तो आरडाओरड करीत असताना ओढ्याजवळ ग्रामस्थ आले.

Solapur : ओढ्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण!
Breaking News : नोटांनी भरलेल्या RBI च्या ट्रकचा भीषण अपघात!

दोरीच्या साहाय्याने वाहत्या पाण्यातून त्यास ओढून बाहेर काढून त्याचे प्राण ग्रामस्थांनी वाचवले. बार्शी शहर अन् तालुक्यातील दहाही मंडलमध्ये मुसळधार पाऊस झाला असून दोन दिवसात बार्शी 72, आगळगाव 68, वैराग 80, पानगाव 88, सुर्डी 64, गौडगाव 57, पांगरी 60, नारी 47, उपळे दुमाला 86, खांडवी 82 असा एकूण सरासरी 71 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

तालुक्यातील ओढे-नाले तुडुंब भरुन वाहत असून अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओढ्याचे पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आह. श्रीपतपिंपरी येथील पुलावरुन पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. बंधारे तुडुंब भरुन वाहत असून कोरेगाव, चारे, वालवड, काटेगाव, कळंबवाडी येथील तलाव शंभर टक्के भरले आहेत. तर, शहरातील सुभाषनगर भागातील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com