Solapur News : हवाई प्रवाशांसाठी खुशखबर! ७२ सीटर विमान सेवेला मिळणार परवानगी

Solapur’s aviation growth : सोलापूर शहरातील वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुकीला गती मिळावी,प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता यावा या अनुषंगाने राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून सोलापूर ते मुंबई तसेच पुणे मार्गासाठी निविदा काढण्यात आली आहे.
solapur airport
solpur airportSaam tv
Published On

सोलापूर ते मुंबई तसेच पुणे मार्गासाठी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने निविदा प्रसिद्ध केली आहे.१५ मार्चपर्यंत निविदेबाबत अंतिम निर्णय होऊन लिलाव सुरू होणार असून, दुसरीकडे याच मार्गावर ४२ सीटर एअरक्रॉफ्ट ऐवजी ७२ सीटर एअरक्रॉफ्टला मंजुरी द्यावी,अशी मागणी विमान कंपन्यांनी केली होती. याबाबत DGCA कडून दहा दिवसांत परवानगी मिळेल,अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी दिली.

सोलापूर येथील होटगी रोड विमानतळावर मिनी पेट्रोल पंप उभारण्यासाठी डीजीसीएने दिली आहे. पंप उभारण्यासाठी साधारण तीन महिन्याचा कालावधी लागेल. त्यापूर्वी टँकरने इंधन पुरवठा करण्याची तयारी एचपीसीए कंपनीने दाखवली असून, मार्च अखेर सोलापुरातून विमानसेवा सुरू होईल,अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने दिली आहे.

solapur airport
Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, कंटेनरची बस आणि दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

या एअरक्रॉफ्टला मंजुरी देण्यावर अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली असून, पूर्वी ४२ सीटर एअरक्रॉफ्टला मान्यता होती. आर्थिकदृष्ट्या ४२ सीटर एअरक्रॉफ्ट परवडणार नाही. त्यामुळे सोलापूर ते मुंबई तसेच सोलापूर ते गोवा आणि तिरुपती मार्गासाठी ७२ सीटर एअरक्रॉफ्टला मान्यता देण्याची मागणी विमान कंपन्यांनी केली आहे.

सोलापूर शहराचा विस्तार होत असताना सोलापूर,आणि मुंबई या हवाई मार्गाचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील. आणि सोलापूर शहराचा सक्षम हवाई वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करून, हवाई वाहतूक नियोजनासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये सोलापूर विमानतळाहून '७२ सीटर' विमान सेवेला दहा दिवसांत परवानगी मिळणार असल्याची माहिती दिली आहे.

सोलापूर ते गोवा व तिरुपती मार्गावरही विमानसेवा सुरू होणार

सोलापूर शहराचा हवाई वाहतुकीच्या दृष्टीने विस्तार करण्यासाठी नियोजन सुरू असून भविष्यात सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते पुणे यासोबतच गोवा व तिरुपतीबालाजीसाठीही ७२ सीटर विमानसेवा सुरू करण्याचा विचार आहे. संबंधित अधिकाऱ्यांची याबाबत सकारात्मक भूमिका असून, यामुळे सोलापूरकरांना देशाच्या महत्त्वाच्या शहरांशी थेट हवाई संपर्क साधता येणार आहे.

solapur airport
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर कारचा विचित्र अपघात, पाच जण जखमी | Video

सोलापूरच्या हवाई वाहतुकीला मोठी चालना!

सोलापूरकरांना लवकरच वेगवान आणि आधुनिक हवाई सेवांचा लाभ मिळणार आहे. हवाई प्रवासाची सुविधा सुरू झाल्यास सोलापूर शहराच्या पर्यटन, उद्योगधंदे आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com