Solapur
SolapurSaam Tv

Solapur: बार्शीतील २ सराफांसह ७ अटकेत, ६ जणांचा शाेधू सुरु : तेजस्वी सातपुते

या प्रकरणातील सहा जणांचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
Published on

साेलापूर : बार्शी (barshi) शहरात गेल्या काही महिन्यांपासून पडत असलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात बार्शी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना (police) यश आले आहे. पाेलिसांनी पाच दरोड्यांचा तपास करुन दाेन सराफांसह ७ जणांना अटक केली आहे. संशयितांकडून तब्बल १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यांच्या तपासाची माहिती साेलापुर (solapur) ग्रामीणच्या पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (tejaswi satpute) यांनी दिली.

बार्शी शहरात गेल्या काही महिन्यांत दरोडे पडले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बार्शी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास यंत्रणा गतीमान कराव्यात असे आदेश दिले हाेते. त्यानूसार बार्शी पाेलिसांनी दराेड्याच्या घटनांचा कसून तपास केला.

Solapur
Viral: मैदानं मारलं; बैलगाडी शर्यतीनंतर शिवेंद्रराजेंचे नृत्य (व्हिडिओ पहा)

या प्रकरणी पाेलिसींनी शाम जडे, कुमार भोसले या दोन सराफांसह (jwellers) किरण भोसले, कृष्णा शिंदे, लक्ष्मण पवार, अमोल शिंदे, अजय भोसले या संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणातील सहा जणांचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान चाेरीचे सोने खरेदी केलेल्या दोघा सराफांकडून आणि अटक केलेल्या संशयितांकडून तब्बल १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Solapur
Politics: 'जाईल तिथं काड्या लावणा-या पवार साहेबांचे आडनाव 'आगलावे' ठेवावं'
Solapur
Rajapur: रिफायनरी विराेधात जनता एकवटली; आज माेर्चा
Solapur
Crime News: प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; ५ अटकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com