सोलापूर : बार्शी तालुक्यातील कुर्डुवाडी रोडवरील पराग लॉज येथे एका महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली. यात बलात्कार, मारहाण आणि जिवे मारण्याच्या धमकीचे गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुर्डुवाडी परिसरात लॉजवर हा प्रकार घडला होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी पीडित महिलेशी पूर्वीपासून ओळख असल्याचा गैरफायदा घेतला. २२ डिसेंबर २०२४ रोजी शहरातील एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या विवाह सोहळ्यानंतर सदर महिलेला घरी सोडतो असे सांगून गाडीत बसवले. मात्र, घरी न नेता तिला कुर्डुवाडी रोडवरील पराग लॉज येथे नेण्यात आले.
लॉजवर नेत अत्याचार व मारहाण
लॉजवर पोहोचल्यानंतर महिलेला संशय आल्याने तिने विरोध केला. त्यावर संशयितानी धमकावत महिलेसोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले. तसेच विरोध केल्याने पट्ट्याने मारहाण करण्यात आली. यावेळी महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली असता लॉजवरील एक कर्मचारी आवाज ऐकून घटनास्थळी धावला. त्याने दरवाजा उघडून महिलेला तातडीने बाहेर काढत सुटका केली.
अखेर गुन्हा दाखल
यानंतर पीडित महिलेला बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आरोपींनी तिला तुळजापूर रोडवर नेऊन तक्रार दिल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. भीतीपोटी महिलेने तक्रार दिली नाही. मात्र, महिले २३ मार्च २०२५ रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर सुरेश परसु माळी (रा. माणकेश्वर, ता. भूम, जि. धाराशिव) आणि संतोष भास्कर भानवसे (रा. भांडगाव, ता. भूम, जि. धाराशिव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.