...तर राजकारण सोडेन; उमेश पाटलांचे राजन पाटलांना खुलं आव्हान

गोरगरीब कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक देऊन त्यांची घरे जाळण्याचा उद्योग बंद करा असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजन पाटलांना लगावला.
Solapur News
Solapur NewsSaam Tv

सोलापूर - तुम्ही अनगर सोडा, मी नरखेड सोडतो. तालुक्यातून कुठूनही उभे राहा. तुमची दोन्ही पोरं सोडा, स्वतः राजन पाटलांनी निवडणुकीला उभे राहावे यात जर मी पराभूत झालो तर तालुक्याचंच काय, जिल्ह्याचं राजकारण सोडेन. गोरगरीब कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक देऊन त्यांची घरे जाळण्याचा उद्योग बंद करा असा टोला राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Unmesh Patil) यांनी राजन पाटलांना (Rajan Patil)लगावला. मोहोळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Solpaur Latest News)

Solapur News
Pune Accident : पुणे नवले पूल टँकर अपघात; जखमींची नावे आली समोर

दोन दिवसांपूर्वी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान राजन पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवा असं आव्हान उमेश पाटील यांना दिले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राजन पाटील यांनीच आपल्या सोबत निवडणूक रिंगणात उतरण्याचे आव्हान केले आहे.

पुढे ते म्हणाले की, ते स्वतः सांगतात की, माझे वडील त्यांच्या वडिलांचे कार्यकर्ते होते आणि असे असताना ते त्या कार्यकर्त्यांच्या मुलाला ओळखत नसतील आणि स्वतःला तालुक्याचे नेते समजत असतील तर आता जे त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत.त्यांनी सुद्धा विचार करणे आवश्यक आहे.

असंस्कारी , चरित्रहीन , लोकांच्या विरोधात माझी लढाई आहे. ती मी लोकशाही मार्गाने लढणार आहे.जनतेला गृहीत धरून हे राजकारण करीत आहेत हे तालुक्यातील जनतेने पूर्णपणे ओळखले आहे.याचा प्रत्यय कालच्या भीमा कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना आला आहे.येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही सर्वजण समविचारी एकत्रित येऊन लढणारा आहोत.असेही यावेळी उमेश पाटील यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com