Pune Accident : पुणे नवले पूल टँकर अपघात; जखमींची नावे आली समोर

पुण्यात रात्रभरात एकूण ३ अपघात
Pune Latest Accident News
Pune Latest Accident NewsSaam TV
Published On

Pune Accident : पुण्यात अपघातच सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे. रविवारी भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री त्याच परिसरात आणखी दोन अपघात झाले. पुण्यात (Pune Accident) रात्रभरात एकूण ३ अपघात झाले आहे. 

ब्रेक निकामी झालेल्या भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री आणखी दोन अपघात झाले. यात सुमारे 25 ते 26 गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे ६ ते १० जण जखमी झाले आहेत. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनरमधील ऑईल रस्त्यावर सांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. 

Pune Latest Accident News
Pune Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात? धक्कादायक कारण समोर

नवले ब्रिजच्या भीषण अपघातानंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला. या अपघातात सात गाड्यांना टेम्पोने उडवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर कात्रज रस्त्यावर दुचाकीचा तिसरा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

नवल ब्रिज अपघातात जखमी झालेल्याची नावे

1) राहुल भाऊराव जाधव

2) शुभम विलास डांबळे

3) तुषार बाळासाहेब जाधव

4)आनंद गोपाळ चव्हाण

5) राजेंद्र देवराम दाभाडे

6) साहू जुनेल

7) ऑस्कर लोबो

8) मधुरा संतोष कारखानीस

9)चित्रांक संतोष कारखानीस

10) तनीषा संतोष कारखानीस

11)विदुला राहुल उतेकर

12) अनघा अजित पभुले

13)अनिता अरुण चौधरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com