Solapur News: मृत पत्नीचे बॅंक खातं बंद करायला गेलेल्‍या पतीला बसला धक्‍का; कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू

मृत पत्नीचे बॅंक खातं बंद करायला गेलेल्‍या पतीला बसला धक्‍का; कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर : पत्‍नीच्‍या नावे असलेले बँक खाते बंद करायला गेले आणि वारसांच्या नावे दोन लाख रुपये जमा झाल्याने मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या (Solapur News) डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या गरीब कुटुंबाने बँक (Bank) मॅनेजरचे आभार व्यक्त केले आहेत. (Tajya Batmya)

Solapur News
Leopard Attack: पतीसोबत दुचाकीवरून प्रवास; मागून बिबट्याचा हल्‍ला, महिला ठार

महिलेचे निधन झाल्‍याने संकट

रवींद्र गायकवाड हे बिगारी कामगार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. रवींद्र गायकवाड यांची पत्नी शिल्पा गायकवाड या सोलापुरातील रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. एक महिन्यापूर्वी शिल्पा गायकवाड यांचे आकस्मिक निधन झाले. शिल्पा गायकवाड यांचा मोठा आधार यांच्या कुटुंबाला होता. शिल्पा यांचे निधन झाल्याने संपूर्ण परिवाराची परवड सुरू झाली.

खात्‍यातील पैसे काढायला गेले अन्‌

रवींद्र गायकवाड यांच्या लक्षात आले की पत्नी शिल्पा गायकवाड यांचे सोलापूर शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते उघडले आहे. त्या अकाउंटमध्ये काहीतरी पैसे शिल्लक असेल, जेणेकरून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होईल. या आशेने पती रवींद्र गायकवाड आणि मित्र यशवंत हे दोघे मिळून सात रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँक येथे पोहोचले. त्यांनी स्टेट बँक येथील शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांना माझा पत्नीचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या पत्नीच्या अकाउंटवरील पैसे मला ट्रान्सफर करून द्या आणि अकाउंट बंद करा अशी विनंती केली.

शाखा अधिकारींनी स्टेटमेंट केले चेक

स्टेट बँकचे शाखा अधिकारी यांनी सदर महिला शिल्पा गायकवाड यांचे स्टेटमेंट चेक केले असता त्यांचे खाते सुरू करताना प्रधानमंत्री जीवन विमा हे काढले होते. हे शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांच्या निदर्शनास आले. प्रधानमंत्री जीवन विमा योजना म्हणजे वर्षाला ४३६ रुपये आपल्या बँक खात्यातून सदर प्रधानमंत्री जीवन योजनेमध्ये वर्ग केले जातात. खाते धारकाचे निधन झाले; तर वारसाला दोन लाख रुपये मिळतात. शिल्पा गायकवाड यांनी प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा लाभ घेतलेला होता.

Solapur News
Jalgaon News: शेतात जावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

अन्‌ अनपेक्षित मिळाले दोन लाख

बँक मॅनेजर यांनी माहिती देत सांगितले की, या योजनेअंतर्गत २ लाख रुपये मिळेल, असे सांगितले. हे ऐकताच रवींद्र गायकवाड यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांचे डोळ्यात आनंदाश्रू आले. मृत पत्नीचे बँक खाते बंद करण्यासाठी आले होते. परंतु त्यांच्या नशिबी दोन लाख रुपये होते. याचा त्यांना आनंद झाला. दरम्यान, त्यावेळी शाखा अधिकारी यांनी सदर कागदपत्र बँकेत जमा करा असे सांगितले. शाखा अधिकारी यांनी स्वतः प्रयत्न करून प्रधानमंत्री जीवन विमा योजनेकडे सर्व कागदपत्र पाठवले आणि दोन लाख रुपये या गरीब कुटुंबाला मिळवून दिले.

तीनही मुलींच्‍या नावे केले एफडी

शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली असता बँक अधिकाऱ्यांनी रवींद्र गायकवाड यांना सदर रक्कम तीन मुलींच्या नावाने एफडी करून देण्यात आली. भविष्यात मुलींच्या लग्नासंदर्भात किंवा शिक्षणासंदर्भात लाभ घेता येईल.असे शाखा अधिकारी यांनी रवींद्र गायकवाड यांना सांगितले आणि त्यावेळेस रवींद्र गायकवाड यांनी देखील होकार दिला.अखेर आज या गरीब कुटुंबाला आधार मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com