Bribe Trap : गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाखांची लाच; सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाखांची लाच; सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Solapur Bribe Trap
Solapur Bribe TrapSaam tv
Published On

सोलापूर : जागेच्या अनुषंगाने समोरील व्यक्तीने दिलेले तक्रार दाखल करून न घेण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल ५ लाखांच्या लाचेची (Bribe) मागणी केली. त्यातील पहिला हप्ता ३ लाख घेण्यास संमती (Solapur) दर्शविल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मनोहर मोरे याला आज जेरबंद केले. (Latest Marathi News)

Solapur Bribe Trap
Hatnur Dam : हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

सोलापूरच्‍या विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत संजय मोरे यांच्याविरुद्ध तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती. त्या अनुषंगाने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.

Solapur Bribe Trap
Sambhajinagar Adarsh Scam : संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळा; कर्ज काढून लाटले २०० कोटी, ५० जणांवर गुन्हा दाखल

सेवानिवृत्‍तीवर होते मोरे

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मोरे याला लाचेचा मोह आवरला नाही हे विशेष. मोरे हे सध्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यास त्याच्या घरातून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com