Sambhajinagar Adarsh Scam : संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळा; कर्ज काढून लाटले २०० कोटी, ५० जणांवर गुन्हा दाखल

संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळा; वेगवेगळ्या संस्थांच्या नावावर कर्ज काढून २०० कोटी लाटले
Sambhajinagar Adarsh Scam
Sambhajinagar Adarsh ScamSaam tv

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने नवा आदर्श घोटाळा केला आहे. गेल्या चार वर्षात पतसंस्थेचे कर्मचारी, नातेवाईक आणि स्वतःच्याच (Sambhajinagar) वेगवेगळ्या संस्थांना विना तारण कर्जाची खिरापत वाटून सर्वसामान्य गरिबांचा पैसा चक्क संचालकांनी लुटला आहे. याप्रकरणी सिडको पोलीस (Police) ठाण्यात पतसंस्थेचा अध्यक्ष अंबादास मानकापेसह ५० जणांवर गुन्हा दाखल झाला. (Breaking Marathi News)

Sambhajinagar Adarsh Scam
Nagpur Snake in Scooter: स्‍कुटरच्‍या हेडलाईटमधून निघाला साप; महिला थोडक्‍यात बचावली, व्हिडिओ झाला व्‍हायरल

छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा मोठा विस्तार आहे. शहरासोबतच तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात आदर्श ग्रुपच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. शेतकरी, कष्टकरी, दुकानदार, व्यापारी आणि नोकरदारांनी या पतसंस्थेमध्ये लाखोच्या ठेवी गुंतवलेल्या आहेत. आकर्षक व्याजदर, दाम दुप्पट योजना, विनाकारण कर्ज अशा वेगवेगळ्या योजना राबवून (Scam) लाखो सभासद या पतसंस्थेची जोडले गेले आहेत. त्या जमा झालेल्या रकमा मात्र संचालक मंडळांनी लुटल्याचं समोर आलंय.

Sambhajinagar Adarsh Scam
Mumbai News : ५६ गुन्हे असलेला इराणी टोळीतील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

नेमका घोटाळा काय?

संचालक मंडळाने ठराविक ठेवीदारांना नियमबाह्य कर्जाची खैरात वाटली. आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या जवळपास १५ संस्थांना ते वाटप केले. तर काही नातेवाईक, ओळखींच्या नावे कर्ज उचलले. यासाठी विनातारण, विनाजामीनदार, बनावट तारण व सभासद उभे करण्यात आले. २०१६ ते २०१९ मध्ये १०३ कोटी १६ लाख ७३ हजार ३८१ रुपयांचा घोटाळा केला. तर २०१८ ते २०२३ मध्ये ९९ कोटी सात लाख ९० हजार ५७९ रुपयांचा घोटाळा केला. २०१९ मध्ये २३ कर्ज प्रकरणात कागदपत्रेदेखील अपूर्ण आहेत, तर २०२१ मधील एका कर्जात अपूर्ण अर्जात कर्जवाटप झाले.

Sambhajinagar Adarsh Scam
Hatnur Dam : हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

संपत्‍तीचा लिलाव करून ठेवीदारांना रक्‍कम

२००३ मध्ये स्थापन झालेल्या आदर्श नागरी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याची गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा होती. त्यामुळे अनेक ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याशिवाय पतसंस्थेतून ठेवलेली रक्कम मिळावी, यासाठी उपोषणही केले होते. मात्र, पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्यामुळे गरिबांच्या ठेवी लुटल्याचं पोलीस तपासात उघड झाले. आता पोलीस आरोपीच्या सर्व संपत्तीची माहिती गोळा करणार आहेत. त्यानंतर त्या जप्तीच्या परवानगीसाठी सरकारकडे अर्ज करून त्या संपत्तीचा लिलाव केला जाईल. मगच ठेवीदारांना रक्कम परत केली मिळेल असं सध्या तरी सांगितलं जातंय. मात्र काही वर्षांपूर्वी राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याची आठवण पुन्हा झाली. पण या आदर्श घोटाळ्याने सर्वसामान्य ठेवीदारांना कंगाल केलंय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com