Mumbai News : ५६ गुन्हे असलेला इराणी टोळीतील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

५६ गुन्हे असलेला इराणी टोळीतील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
Mumbai News
Mumbai NewsSaam tv
Published On

संजय गडदे

मुंबई : मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलिसांनी इराणी टोळीतील एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. ज्याच्यावर आत्तापर्यंत विविध पोलीस (Police) ठाणे अंतर्गत ५६ गुन्हे नोंद आहेत. अंधेरी (Andheri) एमआयडीसी पोलिसांना तो कलम ३९२ च्या गुन्ह्यात फरार आरोपी होता. मात्र तब्बल १६ महिन्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. फैजलअली उर्फ अलीमामा युसूफअली शेख उर्फ इराणी (२८ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Tajya Batmya)

Mumbai News
Nagpur Snake in Scooter: स्‍कुटरच्‍या हेडलाईटमधून निघाला साप; महिला थोडक्‍यात बचावली, व्हिडिओ झाला व्‍हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२२ रोजी उर्मीला सुरेश मिश्रा (वय ६०) ही महिला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यांचल देवी मंदिरात पुजेसाठी जात होती. इतक्यात अंबिका टॉवरच्या जवळ मोटार सायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी पैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व १३ ग्रॅम वजनाची सोन्याची लॉकेटसह चैन असे एकूण २४ ग्रॅम वजनाचे सोने गळ्यातून हिसकावून पळून गेले. यासंदर्भात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Mumbai News
Dhule News : तू आवडतेस, माझ्यासोबत लग्‍न कर; तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग

१६ महिन्‍यांपासून होता फरार

सदर गुन्‍ह्यातील एका आरोपीस यापूर्वी अटक करण्यात आली होती. फैजलअली उर्फ अलीमामा युसूफअली शेख उर्फ इराणी हा पोलिसांना सापडला नव्हता. मागील १ वर्षे ४ महिन्यापासून तो फरार होता. मात्र एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपीचा पत्ता शोधून काढला. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीस घाटकोपर परिसरातून अटक केली आहे. आरोपी विरोधात मुंबईच्या कल्याण, कोळसेवाडी, ठाणे, मानपाडा, डोबिवली, कासारवडवली, चितळसर, कळवा, गबोडी, नारपोली, मुंब्रा, शिळडायगर, कोनगाव, भिवंडी, कांजर मार्ग, पार्कसाईट, पंतनगर, विक्रोळी, पवई या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५६ गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी झोन दहाचे डीसीपी दत्ता नलावडे, सतिश गायकवाड, वपोनि,एमआयडीसी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि यश पालवे, पो.ह.क्र. शंकर काळे, हनमंत पुजारी, पो.ना. नितीन नलावडे, पो.शि. शिवा पवार, प्रदिप चव्हाण, अमोल पवार या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com