Viral News : ऐकावं ते नवलंच! कोंबडीनं दिलं चक्क साडेतीन इंचाचं अंड; आकार पाहून मालकाही बसला धक्का!

कोंबडीने अंड देते ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, एका कोंबडीने चक्क साडेतीन इंचाचं अंड दिल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
Solapur Hen Egg News
Solapur Hen Egg NewsSaam TV
Published On

सोलापूर : कोंबडीने अंड देते ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, एका कोंबडीने चक्क साडेतीन इंचाचं अंड दिल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. सोलापूर (Solapur) शहराजवळ असलेल्या बाळे परिसरातून हा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका देशी कोंबडीने भलं मोठं अंड दिलं आहे. अंड्याचा आकार पाहून कोंबडीचे मालक दशरथ दंदाडे यांना धक्काच बसला आहे. (Solapur Hen Egg Viral Video)

Solapur Hen Egg News
Weather Alert : देशातील 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

तसं पाहता कोंबडी नेहमी २ सेंटिमीटरचे अंड आहे. मात्र, दशरथ दंदाडे यांच्या कोंबडीने चक्क साडेतीन इंचाचं अंड दिलं आहे. ही माहिती परिसरातील नागरिकांना कळताच, त्यांनी हे अंड पाण्यासाठी मोठी गर्दी (Viral News) केली आहे. खुरड्यातून अंडी बाहेर काढताना ही बाब निदर्शनास आली.

दशरथ यांनी ताबडतोब घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली आणि अंड दाखवलं. एवढं मोठं अंड पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. शेजारच्या नागरिकांना देखील कुतूहल वाटले. कोंबडीन दिलेल्या भल्यामोठ्या अंड्याची माहिती वाऱ्यासारखी सोलापुरात पसरली.

Solapur Hen Egg News
Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचा भाव

शहरातील अनेक जण जाऊन साडेतीन इंचाचं अंड पाहत आहेत. हे भलं मोठं अंड फ्रीजमध्ये सांभाळून ठेवण्यात आलं आहे. साडे तीन इंचाच्या अंड्यात डबल बलक असावं अशी शक्यता कोंबडीचे मालक दशरथ यांनी वर्तवली. अजूनही ते अंड फोडलेलं नाही.

घरात असलेल्या २० कोंबड्या अशा प्रकारचं मोठं अंडं देऊ शकतात का, याचा अभ्यास करत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिन्यातून १० ते १२ दिवस किंवा कधीकधी १५ दिवस देशी कोंबड्या अंडी देतात. सोलापुरातील विविध पोल्ट्री चालकांशी संपर्क करून अभ्यास सुरू असल्याची माहिती दशरथ दंदाडे यांनी बोलताना दिली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com