Solapur Fire: माळशिरसच्या कन्हेर गावात आगीची दहशत; ३० ते ३५ एकरावरील ऊसाच्या फडाची राख, कोण आहे गुन्हेगार?

Solapur Sugarcane Fields Fire: माळशिरस तालुक्यातील कन्हेर गावात ऊसाच्या फडाला आगी लागण्याचा घटना वारंवार घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत सुमारे ३५ एकर ऊस जळला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
Sugarcane Fields Fire
Solapur Sugarcane Fields FireSaam Tv
Published On

भारत नागणे, साम प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या कन्हेर गावात असलेले नागरिकांना आगीची भीती वाटू लागलीय. उसाची शेती दिवसाढवळ्या आगीच्या स्थानी भस्म होत असल्याने येथील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झालीय. गेल्या काही दिवसांपासून या गावाच्या शेतातील ऊसाला आग लागल्याचं सत्र सुरू असून ३५ एकरावरील उस जळून खाक झालाय.

या गावाच्या शेतकऱ्यांच्या वाईटावर कोण उठलंय. कोण आहे, जो बळीराजाचं आर्थिक नुकसान करत आहे. लाखो मोलाचं पिक कोण जाळून टाकत आहे, असा प्रश्न येथील शेतकरी पोलिसांना विचारत आहे.

काय आहे घटना

याप्रकरणी अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कन्हेर गावात ऊसाच्या फडाला आगी लागण्याचा घटना वारंवार घडत आहेत. गेल्या काही दिवसात ३० ते ३५ एकरावरील उसाचे फड आगीत राख झाली आहे. या घटनेकडे पोलिसांनी वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केलीय. दरम्यान येथील नागरिकांना या घटनेला विधानसभेच्या निवडणुकीशी संबंध जोडलाय. येथील नागरिकांच्या मते, नुकतीच विधानसभेची निवडणुक झाली आहे. त्यानंतर उसाचा फड पेट घेऊ लागले आहेत.

तरुण शेतकऱ्याने सांगितली आपबीती

शेतकरी धनाजी माने यांनी सांगितले की, आज सकाळी माझा चार एकर ऊस जाळून गेला. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आसपासच्या कोणत्याही गावात असा प्रकार न घडता आमच्या कण्हेरमध्येच का घडत आहेत, असा प्रश्न निलेश माने या तरुण शेतकऱ्याने उपस्थित केलाय. या याप्रकरणी येथील शेतकऱ्यांनी माळशिरस पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे पॉलिसी या घटनेमुळे चक्रावून गेलेत.

काय म्हणतात पोलीस ?

शेतकरी धनाजी माने यांच्या शेतातील ऊस जळल्यानंतर यांनी या घटनेमागे कोण आहे, याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. आमच्याच गावात अशा घटना का घडत आहेत असाही सवाल त्यांनी केला. याप्रकरणी बोलताना पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले, माळशिरस पोलीस हद्दीत कन्हेर गाव येते. येथील शेतकरी श्रीमंत सदाशीव माने यांच्या शेती आहे. त्यांच्या शेतातील उसाचा फड काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास पेटला. कालच त्यांनी आमच्याकडे आकस्मिक आग लागल्याची तक्रार दाखल केलीय.

Sugarcane Fields Fire
Delhi Chalo March : शेतकरी पुन्हा आक्रमक, ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून, काय आहेत प्रमुख मागण्या?

दरम्यान कन्हेर गावातील अजून काही शेतातील उसाचे फड पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. हे फड का पेटतात?, कशामुळे पेटतात? याबाबत तपास चालू आहे. तसेच काही टेक्निकल किंवा विजेच्या शॉर्ट सर्किट झाल्याने उसाच्या फड पेटत आहेत की कोणी बीडी, सिगारेट पित असल्याने फड पेट घेत आहेत का? का गावातील कोणी व्यक्ती जाणूनबुजून करतोय हा तपास केला जातोय.

Sugarcane Fields Fire
Ahilyanagar Rain : अवकाळीने कांद्याची खराबी; गोण्यांमध्ये भरलेला कांदा भिजून एक कोटीचे नुकसान

कोण आहे गुन्हेगार?

ऊसाच्या फडाला आगी लागण्याचा घटना वारंवार घडू लागल्यात. गेल्या पंधरा दिवसांत सुमारे ३५ एकर ऊस जळून खाक झालाय. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ऊसाच्या फडाला आग लागण्याच्या घटनेमुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. दरम्यान शेतातील ऊस पेटण्याच्या घटनेचा पोलिसांनी कसून तपास करावा. त्यामागे कोण आहे, याचा छडा पोलिसांना लावावा, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com