Solapur News : आधी मारहाण, मग मुंडन...चेहरा विद्रुप करण्यासाठी नवऱ्याने बायकोच्या भुवयांवरुन फिरवला ट्रिमर

Barshi Solapur Crime News : पतीने रागात पत्नीला मारहाण करुन तिला मुंडण करण्यास भाग पाडले. त्यानंतर भुवयांवरुन ट्रिमर फिरवला. मारहाण आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेने पतीसह अन्य तिघ्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
Barshi Solapur Crime News
Barshi Solapur Crime News X
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीसह तिघांनी मिळून एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना बार्शीमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. पती, मेहुणा आणि नणंदेकडून मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केले आहेत. या प्रकरणी पीडितेने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणा आणि नणंदेचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पीडित महिलेने तिच्या पतीला दिली. यामुळे पीडितेच्या पतीला संताप अनावर झाला. त्याने महिलेवर अत्याचार करायला सुरुवात केली. रागाच्या भरात पिडीतेच्या पतीने तिला मारहाण केली. तसेच तिचे जबरदस्तीने मुंडन केले असे पीडित महिलेने म्हटले आहे.

Barshi Solapur Crime News
Mohammed Siraj : मनात काहूर, चेहऱ्यावर दडपण, विराटला पाहताच सिराज बॉल टाकायचा थांबला आणि...; इमोशनल Video पाहिलात का?

रागारागात पीडित महिलेच्या पतीने तिचे जबरदस्तीने मुंडन केले. एवढ्यावरच न थांबता, त्याने पीडितेच्या भुवयांवरुन ट्रिमर फिरवत चेहरा विद्रुप केला. मेहुणा आणि नणंदेचे अनैतिक संबंध असल्याचे महिलेने तिच्या पतीला सांगितले होते. यावरुनच हा प्रकार घडल्याचे पीडित महिलेच्या फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

Barshi Solapur Crime News
Beed News: आधी बायकोनं जीव दिला, नंतर नवऱ्यानं झाडाला लटकून आयुष्य संपवलं; २ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

अत्याचारानंतर पीडित महिलेने बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिने पती, मेहुणा आणि नणंद यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली. तिच्या तक्रारीनंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Barshi Solapur Crime News
Borivali: दारूची बाटली घेऊन आला, महिलेशी हुज्जत अन् पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com