

सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक सुनील सदारंगानी यांची आत्महत्या
आत्महत्येपूर्वी प्रार्थना करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ही घटना विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये घडली
आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू
सोलापूरमध्ये प्रसिद्ध व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या व्यावसायिकाचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सोलापूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीच्या मालकाने आत्महत्या केली. सुनील सदारंगानी (६० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सोलापूर शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वीचा त्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
सुनील सदारंगानी यांचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये १७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी सदरंगानी यांनी हात जोडून प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवलं. गुरुवारी दुपारच्या सुमारास ते सोलापुरातील पनाश अपार्टमेंट येथे आले होते. इमारतीच्या आतील पायऱ्यावरून चालत ते थेट अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावर गेले.
भिंतीच्या कठड्यावर एक व्यक्ती हात जोडून उभा असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले त्यांनी ही माहिती अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाला दिली. सुरक्षाराक्षकाने सुनील सदरंगानी यांना खाली आणलं. मात्र चावी वर राहिल्याचा बहाणा करून ते पुन्हा वर गेले आणि वरून त्यांनी उडी मारली. दरम्यान सुनील सदारंगानी यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.