Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Solapur Breaking News : सोलापुरात उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात विजेचा धक्का लागून २४ म्हशींचा मृत्यू झाला आहे. गावातील ओढ्यावरून जाणारी महावितरणची तार तुटून पाण्यात पडल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.
Solapur Breaking
Solapur BreakingSaam Digital

सोलापुरात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. गावातील ओढ्यावरून जाणारी महावितरणची तार तुटून पाण्यात पडल्याने 28 पैकी 24 म्हशींना मृत्यू झाला आहे.

Solapur Breaking
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लूट सुरूच; रेशन कार्ड अपडेटसाठी होतेय पैशांची मागणी

शेतकरी विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या म्हशी दगावल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एका म्हशीची किंमत किमान 1 लाखाच्या पुढे असल्याने शतकऱ्याचे जवळपास 24 लाखाचे नुकसान झालेय. दरम्यान घटनेनंतर पशुपालक शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी म्हणून सोलापूर - बार्शी मार्गावर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरु केल आहे.

बुधवारी कोल्हापुरात विजेचा धक्का लागून सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना सोलापूरमध्ये ही घटना घडलीआहे. यातून महावितरणने काहीच धडा घेतला नसल्याचे दिसत आहे. ओढ्यात विजेची तार तुटून पडली होती. त्याची कोणतीच कल्पना नव्हती आणि शेतकऱ्याने सोडलेल्या म्हशी पाण्यात उतरल्या होत्या. त्यातील २४ म्हशीचा पाण्यातच मृत्यू झाला. ओढ्यातील दृश्य मनाला वेदणा देणारं होतं.

Solapur Breaking
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लूट सुरूच; रेशन कार्ड अपडेटसाठी होतेय पैशांची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com