नागपूरात आजपासून क्यूआर कोडवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम'; काय आहे ही सिस्टीम?

घरोघरी लावणार क्यूआर कोड
नागपूरात आजपासून क्यूआर कोडवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम'; काय आहे ही सिस्टीम?
नागपूरात आजपासून क्यूआर कोडवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम'; काय आहे ही सिस्टीम?संजय डाफ
Published On

संजय डाफ

नागपूर: शहरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी क्यूआर कोड पद्धतीवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम'ची (Smart Waste Management System) सुरुवात करण्यात आलीय.

या उपक्रमाचे उदघाटन आज नागपुर चे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आलं. शहरात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून कचरा गोळा केला जाणार असून यासाठी प्रत्येक घराचे जिओ टॅगिंग करून घरांवर क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात येणार आहे. (Nagpur News In Marathi)

नागपूरात आजपासून क्यूआर कोडवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम'; काय आहे ही सिस्टीम?
रायगड: महाडच्या छबिना उत्सवामध्ये अपघात; आकाश पाळण्यात केस अडकून महिला गंभीर जखमी

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आय.सी.टी.वर आधारित सिस्टिम नागपूरात लागू करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त कंपनीसोबत कचरा संकलन, ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग करण्याची मुभा प्रदान केली आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी आपल्या मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. पहिल्यांदाच नागपूर शहरात अशा पद्धतीची क्यूआर कोड सिस्टिम लावण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com