Prakash Bidwalkar case : प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरण, वैभव नाईकांकडून आकाचा उल्लेख, शिंदेसेनेकडून प्रत्युत्तर

Vaibhav Naik allegations : प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणात वैभव नाईक यांचा गंभीर आरोप, "शिंदे गटातील अंतर्गत वाद आणि गुंडांना पाठबळ देणारा आका कोण?" शिंदे गटाचे प्रत्युत्तर – सिद्धेश शिरसाठ हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता होता.
Vaibhav Naik allegations
Vaibhav Naik allegations
Published On

Prakash Bidwalkar murder case : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर या तरुणाच्या हत्याकांडामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हादरलाय. या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश बिडवलकर यांच्या खूनामागे शिंदे शिवसेनेच्या दोन गटांमधील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे.

वैभव नाईक यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करताना पोलिसांवरही राजकीय दबाव असल्याचा आरोप केला. त्यांनी सिद्धेश शिरसाठ या दारू व्यापाऱ्याच्या अचानक सक्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "सिद्धेश शिरसाट याचे शिंदे गटाशी संबंध आहेत. त्याला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व दोषींचा शोध घेऊन दबाव आणणाऱ्यांची नावे जाहीर करावीत."

Vaibhav Naik allegations
Prakash Bidwalkar Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सिंधुदुर्गात पुनरावृत्ती, आरोपीचा आका कोण? बड्या नेत्याचा गंभीर आरोप

गुंडांना पाठबळ देणारा आका कोण?

वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बिडवलकर खून प्रकरण शिंदे गटातील अंतर्गत वादामुळे उजेडात आले. "खून झाल्याची माहिती एका गटाला होती, पण ती लपवण्याचा प्रयत्न झाला. सिद्धेश शिरसाठ हा गेल्या दीड वर्षांत अचानक सक्रिय कसा झाला? नारायण राणेंच्या विजयानंतर त्याच्याच दारूच्या पैशाने विजयोत्सव साजरा झाला. या गुंडांना पाठबळ देणारा आका कोण आहे?" असा सवाल नाईकांनी उपस्थित केला.

Vaibhav Naik allegations
Sindhudurg Crime : बिडवलकरची हत्या, सिंधुदुर्गचा आका कोण? अमानुष हत्येनं बीडपाठोपाठ सिंधुदुर्ग हादरलं

वैभव नाईक वाल्मीक कराड होते, शिंदे सेनेचे प्रत्युत्तर -

वैभव नाईक यांच्या आरोपाला शिंदे सेनेच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी नाईकांच्या आरोपाला उत्तर दिलेय. सिद्धेश शिरसाठ हा उद्धव ठाकरे गटाचा सक्रिय कार्यकर्ता होता. शिरसाठ याचा वावर माजी आमदार वैभव नाईक यांच्याबरोबर होता. त्याचे छायाचित्र देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. वैभव नाईक आमदार असताना त्यावेळी गप्प का बसले. या घटनेला वैभव नाईक यांची मुखसंमती होती का? त्यावेळी वैभव नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याची तुलना बीडशी करत असतील तर त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैभव नाईक वाल्मीक कराड होते त्यावर आमचे ठाम मत आहे..

माझा कोणताही संबंध नाही - नाईक

सिद्धेश शिरसाठ याच्याशी कोणताही संबंध असल्याचे आरोप नाईक यांनी फेटाळून लावले. "गेल्या पंधरा वर्षांत सिद्धेश शिरसाठ माझा कार्यकर्ता नव्हता. त्याच्यासोबत माझा एकही फोटो नाही. जर तो माझ्यासोबत शाखेत दिसला असेल, तर दाखवावे," असे आव्हान त्यांनी केले. तसेच, "हे प्रकरण मला आधी कळले असते, तर मी तेव्हाच आवाज उठवला असता," असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com