Sindhudurg : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; दोन महिलांसह ६ जणांना अटक

दर व्हेल माशाची उलटीची किंमत तब्बल २२ कोटी ३७ लाख रुपये एवढी आहे.
Sindhudurg  News
Sindhudurg NewsSaam TV
Published On

विनायक वंजारे, साम टिव्ही

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्गात (Sindhudurg) व्हेल माशाची उलटी तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण (Police) विभागाने सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यात ४ पुरूषांसह २ महिलांचा समावेश आहे. ही कारवाई देवगड पवनचक्की गार्डन येथे सापळा रचून करण्यात आली. यात १२ किलो ३७० ग्रॅम वजनाची उलटी जप्त करण्यात आली. (Sindhudurg News Today)

Sindhudurg  News
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; रुपीनंतर आणखी एका बॅंकेचा परवाना रद्द

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दराप्रमाणे सदर व्हेल माशाची उलटीची किंमत तब्बल २२ कोटी ३७ लाख रुपये एवढी आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी व चारचाकी, अशी दोन वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

जिल्हयातील देवगड या ठिकाणी व्हेल माशाची उल्टीची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकeरी व अंमलदार यांच्या पथकाने देवगड पवनचक्की गार्डन समोर सापळा रचून ४ पुरुष व २ महिलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली.

Sindhudurg  News
Corruption: भ्रष्टाचार प्रकरणात चीनच्या माजी मंत्र्यांसह दोघांना मृत्युदंडाची शिक्षा

त्यांच्याकडे २२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दराप्रमाणे व्हेल माशाच्या उल्टी सदृश्य पदार्थाची किंमत तब्बल २२ कोटी ३७ लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

या तस्करांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39,42,43,44,48,51 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com