Saam Special Report: सिंदफना नदीने पात्र बदलल्याने पिकांसह जमिनीही गेल्या वाहून; मदतीसाठी शेतकऱ्यांची सरकारला आर्त हाक

Sindafana River Changed Its Course: अतिवृष्टीच्या खाईत होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या व्यथा शेतकऱ्याने साम टिव्हीकडे मांडल्या आहेत.
Beed Farmer News
Beed Farmer Newsविनोद जिरे

Beed Farmers News: बीड जिल्ह्यातील शेतकरी गत दोन वर्षांपासून अस्मानी अन सुलतानी संकटाचा सामना करतोय. यंदा देखील अतिवृष्टीने कहर केला. यामुळं शेतकऱ्यांनी (Farmers) उराशी बाळगलेल्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. उभी पिकं तर वाहून गेलीच आहेत, मात्र शेतातून आता नदी वाहतेय. मोलमजूरी, कर्ज काढून घेतलेल्या जमिनीचे आता नदीपात्र झालंय. पूर्ण शेती आता वाहून गेलीय, त्यामुळं सांगा आम्ही जगावं कसं? अशी आर्त हाक अस्मानी आणि सुलतानी संकट पीडित शेतकऱ्यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या खाईत होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या व्यथा शेतकऱ्याने साम टिव्हीकडे मांडल्या आहेत. (Beed Latest News)

Beed Farmer News
Beed : शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच; एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी संपलं आयुष्य

बीडमधील (Beed) कुर्ला गावाच्या शेजारी औरंगपूर गाव आहे. या दोन्ही गावच्या शिवारातून सिंदफना नदी (Sindphana River) वाहतेय. या नदीवर शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी पाण्याची साठवणूक व्हावी यासाठी, पाटबंधारे विभागाने केटीवेअर बंधारा बांधलाय. मात्र हा बंधारा आणि नदी शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी एक प्रकारे ग्रहण ठरलीय. त्याला कारणही तसंच आहे. केवळ पाटबांधरे विभागातील अधिकारी आणि संबंधित गुत्तेदार यांच्या मनमानीपणामुळे सिंदफना नदीने पात्र बदललं आणि चक्क परिसरातील जवळपास 8 एकर शेती हे आता नदी पात्र बनलं आहे. (Sindafana river changed its course)

Beed Farmer News
टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले,'एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे...'

हे चित्र पाहून आपल्याही मनाला पाझर फुटेल. ज्या शेतात जीवचं रान करून पिक घेतलं, ते पीकचं नाहीतर मातीसह जमीन देखील वाहून गेलीय. जवळपास 25 ते 30 फूट खोल आणि शेकडो फूट लांब असं शेत वाहून गेलंय. विशेष म्हणजे गतवर्षी या शेतातील विहीर वाहून गेली आहे. तर यंदा बोअर देखील वाहून गेलाय. दोन दिवसांपूर्वी जवळपास 30 फूट लांब अशी जमीनही वाहून गेलीय. दररोज नदीमध्ये शेतीसह माती ढासळत आहे. यामुळं शेतकऱ्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न या नदीतील पाण्यात वाहून जात आहे. (Latest Marathi News)

औरंगपूर गावातील महिला शेतकरी जिजाबाई उनवणे यांनी मोलमजुरी करून आणि लोकांचं कर्ज काढून पाच एकर शेती घेतली. घरात कुणीही नोकरदार नसल्याने, याच शेतीवर त्यांचे तीन मुलं आणि दोघे नवरा बायको, हे मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र 5 एक्कर पैकी जवळपास तीन एकर शेती नदीत वाहून गेलीय. या तीन एकर शेतीमध्ये नदीचं पात्र बनले आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. यामुळं मुख्यमंत्री साहेब बहीण-बाळ समजून मदत करा... जमिनीतून नदी वाहतेय... नुकसान भरपाई द्या, नाहीतर बंधाऱ्यात उडी घेऊन जीव देईल... अशी आर्त हाक आपल्या व्यथा सांगताना अश्रू अनावर झालेल्या जिजाबाई उनवणे यांनी दिलाय. (LIVE Marathi News)

याविषयी नुकसानग्रस्त शेतकरी कल्याण उनवणे म्हणाले, की माझ्यासह 10 ते 12 शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलीय. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नाही. गतवर्षी माझी विहीर वाहून गेली होती, तर दोन दिवसांपूर्वी बोरही वाहून गेलाय. त्याचबरोबर यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 30 फूट जमिनीला देखील नदीचं रूप आलंय. त्यामुळे आता कुठे पेरावा? आता जगावं कसं? असा प्रश्न उभा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही देखील या नदीपात्रात उडी घेऊ, असा इशारा कल्याण उनवणे यांनी दिला आहे.(Maharashtra News)

Beed Farmer News
Aurangabad Crime: ऐन दिवाळीत झालेल्या खुनाचा पर्दाफाश; पोलिसांनी 72 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

दरम्यान गत दोन वर्षांपासून होत असणाऱ्या अतिवृष्टीने, सोयाबीनची माती तर कापसाच्या वाती झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे. या औरंगपूरच्या शेतकऱ्यांची पीकचं नाही तर मातीसह जमीनीदेखील वाहून गेल्या आहेत. मात्र आसमानी संकटात होरपळलेला शेतकरी सुलतानी संकटाने हतबल होत आहे. त्यामुळं आतातरी हतबल झालेल्या शेतकऱ्यांना हे निर्दयी प्रशासन आणि सरकार आधार देणार का? आणि अतिवृष्टी पीडित या बळीराजाला पुन्हा एकदा उभं करणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com