CCTV Footage: सुट्टे न दिल्यानं दुकानदाराला दुकानात घुसून मारहाण, उल्हासनगरच्या खेमानी भागातील घटना, पाहा VIDEO

Shopkeeper Beaten CCTV Footage: संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
CCTV Footage
CCTV FootageSaam TV
Published On

Ulhasnagar News : दुकानदाराने ५०० रुपये सुट्टे दिले नाही म्हणून एकाने दुकानात घुसून दुकानदाराला बेदम मारहाण केली आहे. उल्हासनगर शहरात ही घटना घडली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Latest Marathi News)

उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील खेमाणी चौकात न्यू प्रियंका मोबाईल नावाचं दुकान आहे. याठिकाणी दोन तरुण ५०० रुपये सुट्टे मागण्यासाठी आले. मात्र दुकानदाराने सुट्टे पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने या तरुणांनी थेट या दुकानात घुसून दुकानदाराला मारहाण करायला सुरुवात केली. (ulhasnagar News)

CCTV Footage
Mumbai Crime News: मोबाईलपुढे आयुष्य हरलं; आई-वडील ओरडले म्हणून अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान किरकोळ कारणावरून व्यापाऱ्यांना दिवसाढवळ्या दुकानात घुसून मारहाण होत असेल तर अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक तरी उरलाय का? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com