महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, PSI बदने अन् बनकरबाबत धक्कादायक माहिती

Shocking Twist in Satara Phaltan Doctor Case: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय. महिला डॉक्टरने दोघांविरोधात तक्रार दाखल केली नसल्याचं समोर आलंय.
Shocking Twist in Satara Phaltan Doctor Case
Shocking Twist in Satara Phaltan Doctor CaseSaam
Published On
Summary
  • महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट.

  • दोघांविरोधात महिला डॉक्टरने पूर्वी कधीही तक्रार केली नव्हती.

  • सातारा पोलिसांकडून तपास सुरू.

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांनी एका पोलिसावर बलात्कार आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. कुटुंबियांनी महिला डॉक्टरवर पोलीस आणि राजकीय दबाव असल्याचं सांगितलं. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महिला डॉक्टरने पोलीस आणि बनकरविरोधात पूर्वी कधी तक्रार दाखल केली नसल्याचं समोर आलं आहे.

महिला डॉक्टरने गुरूवारी हॉटेलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेनं हातावर सुसाईड करण्यामागचं कारण लिहिलं. त्यांनी हातावर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी बलात्कार केला असल्याचा गंभीर आरोप केला. तर, प्रशांत बनकर यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचं सांगितलं.

Shocking Twist in Satara Phaltan Doctor Case
पोलिसांकडून बलात्कार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील ५ मोठे खुलासे

आता महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. महिला डॉक्टरने याआधी पोलीस बदने आणि बनकर यांच्याविरोधात कधीच तक्रार केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिक वाढत चाललं आहे. विश्वसनीय सूत्रांनी साम टिव्हीला दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने याआधी पोलीस बदने आणि बनकरविरोधात तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

Shocking Twist in Satara Phaltan Doctor Case
धावत्या ट्रेनमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; क्षणात सर्वत्र आगच आग, रात्री नेमकं काय घडलं?

दरम्यान, महिला डॉक्टरवर बलात्कार आणि मानसिक छळ झाला होता का? या अनुषंगाने सातारा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर यांनी याआधी कार्यालयीन कामकाजाच्याबाबतीत तीन पोलिस अधिकाऱ्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलीस बदने आणि बनकर या दोघांविरोधात महिला डॉक्टरने कधी तक्रार दाखल केली नव्हती, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com