
वाडा तालुक्यातील अंबिस्ते गावात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
ही घटना आदिवासी वस्तीशाळेमध्ये घडली
मृत विद्यार्थी ९वी आणि १०वीत शिक्षण घेत होते
आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत
पालघर जिल्ह्यातल्या वाडामधील एका शाळेमध्ये दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. वाडा तालुक्यातील अंबिस्ते गावात ही घटना घडली. गळफास घेऊन या विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागचे कारण समोर आले नाही. या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबिस्ते गावातील आदिवासी वस्तीशाळेत राहून शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर विद्यार्थ्यांचे मृतदेह वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते गावातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार यांच्या कार्य क्षेत्रात येणारी आदिवासी वस्तीगृह आणि वास्तीशाळेत ही घटना घडली. या ठिकाणी शिक्षण घेणारा देविदास परशुराम नावळे (इयत्ता १० वी रा. बिवळपाडा ता . मोखाडा) आणि मनोज सीताराम वड (इयात्ता - ९ वी रा. दापटी ता. मोडाखा) या दोघांनी आत्महत्या केली. हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या आदिवासी वस्तीगृहात होते. त्यांनी शाळेच्या आवारातील झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं.
आज सकाळी देविदास आणि मनोज या दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत वस्तीशाळेत आढळून आले. या घटनेमुळे शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. दोघांचे मृतदेह पाहून इतर विद्यार्थि प्रचंड घाबरले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे संबंधित विभागावर पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.