अक्षय तृतीयेचा दिवशी स्मशानभूमीत घडला धक्कादायक प्रकार; तुळजापुरात खळबळ

Ashes Stolen from Cremation Ground In Dharashiv: तुळजापूर येथील स्मशानभूमीतून जळीत प्रेताची राख चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोणा किंवा अंधश्रद्धेमुळे हे कृत्य केले असावे असा संशय व्यक्त केला जातोय.
Ashes Stolen from Cremation Ground In Dharashiv:
Police investigate shocking ash theft from a cremation ground in Tuljapur on Akshaya Tritiya.
Published On
Summary
  • तुळजापूरमध्ये स्मशानभूमीतून राख चोरीची घटना

  • अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

  • नातेवाईकांनी दिलेल्या माहितीमुळे प्रकरण उघडकीस

स्मशानभूमीतून प्रेताचे अवशेष गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमधील तुळजापुरात घडला आहे. अक्षय तृतीयांचा शुभ मुहूर्तावर हा प्रकार घडल्यामुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे.जादूटोण्याच्या संशयातून हे कृत्य केले असावे असा संशय व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार,धाराशिव अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुळजापुरात खळबळ उडून देणारी घटना उघडकीस आली आहे.

Ashes Stolen from Cremation Ground In Dharashiv:
Crime news: स्मशानात नेऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, २ तास डांबून ठेवल्यानंतर नराधमांच्या तावडीतून केली सुटका

तुळजापूर येथील समशानभूमीतील जळीत प्रेताची राख चोरीला गेली आहे.अक्षय तृतीयेच्या दिवशी ही प्रकार घडल्यानं लोक भयभीत झाले आहेत. तुळजापूरमधील एका महिलेचं मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर नातेवाईक जेव्हा तिसऱ्या दिवशी राख जमा करण्यासाठी गेले.

त्यावेळी प्रेताच्या छातीवरील भागाची पूर्ण राख चोरीला गेल्याच निदर्शनात आले. डोके, गळ्याची छातीच्या भागाची हाडं बाजुला काढून तेथील संपूर्ण राख चोरीला गेली आहे. हे कशामुळे केलं कोणी केलं हे कळत नाहीये.

Ashes Stolen from Cremation Ground In Dharashiv:
Hingoli: सरकारी कर्मचाऱ्याकडून अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव, तरुणाने संपवलं आयुष्य; हिंगोलीत खळबळ

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जळलेल्या प्रेतांची राख चोरीला जातेय. महिलांच्या अंगावर दागिने असतात . त्यामुळे ते मिळवण्यासाठी राख चोरत असतील. किंवा भानामती करणारे, करणी करणारे ही राख घेऊ जात असतील. असे प्रकार घडू नये यासाठी शासनाने स्मशानभूमीत काही तरी योजना आखावी.

कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार सोन्याच्या दागिन्यासाठीच राख चोरीला गेली असावी असा अंदाज आहे. तर काहींच्या मते, जादूटोण्याच्या प्रकारातून हा प्रकार घडला असल्याचा संशय आहे. असा प्रकार पहिल्यांदा घडला नाहीये याआधीही असे प्रकार घडले होते. स्मशानामध्ये मृतदेहाची अशी विटंबना कुणी आणि का केली, या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय.

१५ दिवसांपूर्वीही स्मशानातून प्रेताची राख गायब

गेल्या पंधरा दिवसात तुळजापूरच्या समशान भूमीतून असेच जाळलेल्या प्रेताचे राख आणि हाडं गायब झाली होती. त्यावेळी सुद्धा लोकांनी याबद्दल आवाज उठवला होता. पोलिसांकडेही या बद्दल मागणी करण्यात आली होती. आता रविवारी घडलेल्या प्रकारानंतर नातेवाईकांनी याबाबत पोलिसांना तक्रार दिली आहे. पण पोलिसांनी अद्यापपर्यंत घटनेचा तपास कुठलाच केला गेला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com