Gadchiroli : धक्कदायक! २५ वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह जमीनीत पुरला; १० दिवसांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात तलावाजवळ जमिनीत पुरलेला अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा संशय व्यक्त होत आहे.
Gadchiroli : धक्कदायक! २५ वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह जमीनीत पुरला; १० दिवसांनी समोर आलं धक्कादायक सत्य
Gadchiroli Crime News Saam Tv
Published On
Summary
  • कोरची तालुक्यात तलावाजवळ जमिनीत पुरलेला मृतदेह सापडला

  • मृतदेह ८ ते १० दिवस जुना असल्याचा प्राथमिक अंदाज

  • युवकाची हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा संशय

  • कोरची पोलिसांकडून तपास सुरू, ओळख पटवण्याचे प्रयत्न

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोलीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २५ ते ३५ वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या स्थितीत आढळला. हा मृतदेह जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील कोटरा ते बोगाटोला रस्त्यालगतच्या गावतलावाजवळ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या युवकाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला जमिनीत पुरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

कोरची पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सदर मृतदेह तलावाजवळ खड्डा करून त्यात पुरण्यात आला होता. पण तो पूर्णपणे जमिनीखाली नसल्याने मृतदेहावरील माती बाजुला होऊन तो थोडा उघडा पडला होता. मृतदेह कुजण्याच्या स्थितीत असल्याने तो ८ ते १० दिवसांपासून तिथे होता असा पोलिसांनी स्पष्ट केले.

Gadchiroli : धक्कदायक! २५ वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह जमीनीत पुरला; १० दिवसांनी समोर आलं धक्कादायक सत्य
Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!

मुलेटिपदीकसा या गावचे पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून कोरची ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख आणि गावकऱ्यांनी मिळून तिथे पाहणी केली. त्या इसमाच्या अंगात पॅन्ट व शर्ट घातलेला असून दोन्ही हातात कडे होते. चेहरा पूर्णपणे काळा पडून अंगाला अळ्या लागलेल्या दिसत होत्या. पोलिसांनी मर्ग दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com