Maharashtra Political News : ठाकरे गटाला मोठा धक्का; अकोल्यातील बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

'महाराष्ट्र एसटी कामगार सेने'चे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
uddhav Thackeray
uddhav Thackeraysaam tv
Published On

Akola political News : अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जेष्ठ नेते आणि शिवसेना प्रणित 'महाराष्ट्र एसटी कामगार सेने'चे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविला आहे. यासोबतच महाराष्ट्र एसटी कामगार सेने'च्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांना पाठविला आहे. (Latest Marathi News)

uddhav Thackeray
CM Eknath Shinde : '...अन् बिनकामाचे काढतात मोर्चा'; मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर जोरदार टीका

विजय मालोकारांच्या राजीनाम्याने अकोल्यातील ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. विजय मालोकारांच्या पुढच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत.

शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. 1999 मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षानं डावलल्यामूळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढली होती.

uddhav Thackeray
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचं नरेंद्र मोदींवर मोठं वक्तव्य; म्हणाले, 'पंतप्रधानांना तुरुंगात पाठवायचे असेल, तर...'

2004 मध्ये त्यांनी 40 हजार मते मिळत अल्प मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं. तर 2009 मध्ये 'जनसुराज्य पक्षा'चे उमेदवार म्हणून मालोकारांनी 30 हजार मते घेतली होती. त्यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. विजय मालोकार ठाकरे गटाच्या राजीनाम्यानंतर पुढे कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com