Maharashtra Political News : महाविकास आघाडीचं ठरलं! 31 डिसेंबरआधी होणार मोठा निर्णय

Sanjay Raut On Mahavikas Aghadi Seat Sharing : महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत व्हावी हे ठरलं आहे. यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांनी देखील सहमती दाखवली आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSaam Tv
Published On

Sanjay Raut News :

राज्यात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सर्वच पक्ष मतदारसंघांचा आढावा आणि पक्षबांधणीत गुंतले आहेत. महाविकास आघाडीने देखील महायुतीला जोरदार टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय ३१ डिसेंबरआधी होईल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. शरद पवार आणि आमचा संवाद उत्तम आहे. राज्याचा जागावाटप फॉर्म्युला 31 डिसेंबरच्या आधी होईल. उद्धव ठाकरे या महिन्यात पुन्हा दिल्लीत येऊ शकतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavikas Aghadi
Manoj Jarange Patil : २३ तारखेला 'दूध का दूध, पानी का पानी' होईल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत व्हावी हे ठरलं आहे. यासाठी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांनी देखील सहमती दाखवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा लवकरच होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (Political News)

इंडिया आघाडीच्या बैठकीत काय झालं?

इंडियाची आघाडीची चौथी बैठक नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीने महत्त्वाची निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभे असतील. यासोबत जागा वाटपाबाबतही महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Mahavikas Aghadi
Sharad Pawar: पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आक्रोश मोर्चा

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यावर काल पहिल्यांदा चर्चा झाली. अनेक पक्षांनी मल्लिकार्जून खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली आणि ती चर्चा सकारात्मक झाली. राहुल गांधी यांना कुठल्याही सत्तेच्या पदावर कुठलाही रस नाही, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com