- विनायक वंजारे
सिंधुदुर्ग : एखादा आमदार जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारावर हल्ला करतो, त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करतो, ही घटना सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे. मात्र, कायदा सर्वांना समान असतो तो कोणालाही सोडत नाही, हे कालच्या नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकेमुळे सिद्ध झाले आहे. यापुढे सिंधुदुर्गात संतोष परब हल्ला प्रकरणा सारखी घटना घडू नये आणि प्रत्येक निवडणुका भयमुक्त वातावरणात घेतल्या जाव्यात, यासाठी शिवसेना (Shivsena) पुढाकार घेईल असे विधान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केले आहे.
प्रत्येक निवडणुकीत दादागिरी करायची आणि मतदारांवर दबाव आणायचा असा प्रयत्न काही मंडळी करतात. मात्र, यापुढे असं काहीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नाही असे प्रकार केले तर त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते काल दिसले आणि उद्याही दिसेल त्यामुळे यापुढील निवडणुकीत कोणाचाही दबाव राहणार नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी मालवण मधे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राणेंवर केली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.