Akola News: ठाकरे गटाच्या आमदाराला ACBची नोटीस; 17 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

नितीन देशमुख तेच आमदार आहेत जे शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आले होते.
MLA Nitin Deshmukh
MLA Nitin DeshmukhSaam Tv
Published On

अकोला : शिवसेच्या ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीसद्वारे त्यांना देण्यात आले आहेत. येत्या १७ जानेवारीला त्यांना एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नितीन देशमुख तेच आमदार आहेत जे शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आले होते. त्यामुळे सुडापोटी त्यांना ही नोटीस धाडल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

MLA Nitin Deshmukh
Chandrashekhar Bavankule: भाजप विधान परिषद निवडणुकीसाठी सज्ज; चंद्रशेखर बावनकुळेंनी ३ उमेदवार केले जाहीर

आमदार नितीन देशमुख यांच्याविरुद्ध अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यात आली होती. देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने, यांसह अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करत अकोल्यातील एका व्यक्तीने अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी अमरावतीच्या एसीबीने आमदार नितीन देशमुख यांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांना एसीबी ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

MLA Nitin Deshmukh
Mumbai : 'देश एकसंध ठेवण्यात केरळचे मोठे योगदान' राज्यपाल भगतसिंग कोशारींचे प्रतिपादन, मल्याळी भाषिकांंनाही मराठी शिकण्याचा दिला सल्ला

याबाबत प्रतिक्रिया देताना नितीन देशमुख यांनी म्हटलं, की बेनामी संपत्तीबाबत मला नोटीस पाठवली आहे. नोटीस पाहून मला हसू आलं. माझ्याकडे बेनामी संपत्ती कुठून आली. जेव्हापासून सरकार बदललं अशा नोटीसा आम्हाला येत आहेत. आम्हाला या गोष्टी अपेक्षित होत्या. आता आम्ही ईडी नोटीसची वाट बघत आहोत, असा टोलाही नितीन देशमुख यांनी लागवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com