Chandrashekhar Bavankule : जानेवारीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या ५ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. अशात भाजपने त्यांच्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. (Latest Marathi Chandrashekhar Bawankule News)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे, मराठ वाड्यासाठी किरण पाटील, पश्चिम विदर्भात रणजित पाटील. अशी नावे त्यांनी जाहीर केली आहेत.
तसचे पूर्व विदर्भाबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असून नाशिकचा निर्णय देखील एक ते दोन दिवसात होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. नागपूर विभाग शिक्षकमतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आता जवळ आली आहे. मात्र अद्याप भाजप आणि कॉंग्रेसचा मतदार ठरलेला नाही. यामुळे मतदार आणि इच्छुक उमेदवरांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
पुढे बावनकुळे म्हणाले की, " ना गो गाणार यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. शिक्षक परिषदेचे दोन टर्म आमदार राहिलेल्या गाणार यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षक परिषदेला आम्ही नेहमी पाठींबा देतो. नाशिक - कोकणात सीट आमच्याकडे नाही. म्हात्रे हे प्रभावी उमेदवार आहेत. जनतेने पाठींबा दिल्याने. चार हजारच्यावर ग्रामपंचायत आम्ही जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व जागा जिंकू, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
बावनकुळेसदर निवडणूकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील सर्व आमदारांची मते जाणून घेतली. गाणार यांच्यासह कल्पना पांडे आणि अनिल शिवणकर हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यामुळे बावनकुळे यांनी उच्चस्तरीय बैठक घेत आमदारांची मते जाणून घेतली तेव्हा गाणार यांना जास्त मतं मिळाली. मात्र गाणार यांच्यावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.