MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी वेळेत पूर्ण होणार, पण निकाल लांबणीवर?

MLA Disqualification Case Hearing Update : निकालाचे लेखन करण्यासाठी मात्र अधिकचा वेळ लागू शकतो. एक हजारांहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचे विधीमंडळासमोर मोठं आव्हान असेल.
MLA Disqualification Case Hearing Update
MLA Disqualification Case Hearing Update Saam TV
Published On

सूरज मसूरकर

Nagpur News :

शिवसेना आमदार आपत्रतेची सुनावणी सध्या सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रता प्रकरणी ३१ डिसेंबरच्या आता निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ओव्हरटाईम करत सुनावणी घेत आहेत. मात्र तरीदेखील निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने अधिकचा ३ आठवड्यांचा वेळ देखील मागितला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात २ लाख पानांचे दस्तावेज तयार करण्यात आले आहेत. ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे विविध ६ निकाल लागणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही २० डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MLA Disqualification Case Hearing Update
Manoj jarange Patil: 'भुजबळ विश्वासघातकी माणूस, फडणवीसांनी त्यांचा डाव ओळखावा...' जरांगे पाटलांचा पलटवार; काय म्हणाले?

मात्र २१ ते ३१ डिसेंबर कालावधीत निकालाचे लेखन अशक्य असल्याचं समोर येत आहे. निकालाचे लेखन करण्यासाठी मात्र अधिकचा वेळ लागू शकतो. एक हजारांहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे वाचन करण्याचे विधीमंडळासमोर मोठं आव्हान असेल. (Latest Marathi News)

MLA Disqualification Case Hearing Update
Mumbai News: मुंबईकरांसाठी BEST निर्णय! '२०२७ पर्यंत 'बेस्ट उपक्रमात' सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक...' मंत्री उदय सामंत यांची माहिती

याशिवाय नागपूरहून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी देखील वेळ लागणार आहे. परिणामी, सहा निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात ३ आठवड्यांची वेळ मागितली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात विधीमंडळाकडून याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com