Sanjay Raut: '....तर ५० वर्ष जेलबाहेर येणार नाही' संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा; म्हणाले, 'नामर्दासारखा पळून तर.....'

मी अजुन नारायण राणे यांच्याबद्दल काही बोललो नाही, नारायण राणेंसारखे इडीच्या नोटीसा येताच पळून जाणारे आम्ही नाही. पण जर धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजुला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो.
Sanjay Raut Narayan Rane
Sanjay Raut Narayan RaneSaam Tv news
Published On

Sanjay Raut: केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचे कात्रण काढून ठेवले असून, संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, संजय राऊत यांना मी सोडणार नाही, असे विधान केले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राजवस्त्र काढून या मग तुम्हाला दाखवतो, असे म्हणत नारायण राणेंना (Narayan Rane) सुणावले आहे.

Sanjay Raut Narayan Rane
Sangli News: चक्क महाराजांना घ्यायला पाठविले हेलिकॉप्टर; किर्तनासाठी वेळ होत असल्याने आयोजकांचा पुढाकार

नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल करताना संजय राऊत यांनी, "मी अजुन नारायण राणे यांच्याबद्दल काही बोललो नाही, नारायण राणेंसारखे इडीच्या नोटीसा येताच पळून जाणारे आम्ही नाही. पण जर धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजुला ठेवा, मग तुम्हाला दाखवतो. माझ्या नादाला लागू नका, जर तुमचे कारनामे बाहेर काढले तर ५० वर्ष बाहेर येणार नाही," अशा शब्दात जोरदार टीका केली आहे.

त्याचबरोबर "मी पक्षासाठी जेलमध्ये गेलो, तुमच्या सारखा पळून गेलो नाही, तुमच्या हातात न्यायालयाने कायदा दिला आहे का, मला जेलमध्ये कसे घालणार?" असा सवाल ही त्यांनी यावेळी विचारला आहे.

Sanjay Raut Narayan Rane
Crime News: मित्रचं ठरले वैरी! जुन्या भांडणाचा राग, चार अल्पवयीन मित्रांनी मित्राचीच केली भोसकून हत्या

दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबद्दलही मोठे वक्तव्य केले आहे. याबद्दल बोलताना त्यांंनी "योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मुंबईमध्ये येवून ते त्यांच्या राज्यासाठी विकासाचा मॉल घेवून जात असतील तर काही हरकत नाही," अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com