Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेवरुन विरोधक-सत्ताधारी सध्या आमनेसामने आहेत. शिवसेनेचे नेते आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.
ते तिघे मिळून सभा घेत आहेत. त्यांनी अशा कितीही सभा घेतल्या तरी सरकार युतीचेच येणार आहे, असा विश्वास संदीपान भूमरे यांनी व्यक्त केला. बीडच्या नारायणगड येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं.
महाविकास आघाडीची सभा छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. मात्र त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी युतीचंचं सरकार येणार आहे. आज सगळ्या ठिकाणी त्यांना महाविकास आघाडी म्हणून सभा घ्यावी लागत आहे. (Latest marathi News)
ते एकटे सभा घेत नाहीत, तिघे मिळून सभा घेत आहे. मात्र संभाजीनगरची जी सभा होईल , ती फक्त शिवसेनेची होईल. मग ती कशी होईल ते बघा, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला खुलं आव्हान देखील दिलं.
प्रकाश आंबेडकर येऊ द्या, राष्ट्रवादी येऊ द्या, ठाकरे गट येऊ द्या , पानिपत कुणाचं होतं ते 2024 च्या निवडणुकीत दिसेल, असं म्हणत भुमरे यांनी प्रकाश आंबेडकरांवर देखील निशाणा साधला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.