‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही : शिवसेना

सामनाच्या आजच्या अग्रलेखात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आला.
Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Devendra Fadnavis Vs Sanjay RautSaam TV
Published On

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या राज्यसभा उमेवारीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं. शिवसेनेनं (Shivsena) पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर संभाजीराजेंनी पत्रकारपरिषद घेत आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. संभाजीराजे यांनी माघार घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप केला. याच मुद्द्यावरून विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरलं. आता शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून विरोधकांवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. सामनाच्या आजच्या अग्रलेखात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यात आला. (Devendra Fadnavis Vs Sanjay Raut)

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
Breaking : महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही - एकनाथ शिंदे

"फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत"

"कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप उडी कशी मारली नाही? असा प्रश्न सगळय़ांनाच पडला होता, पण फडणवीस यांनी लोकांची निराशा केली नाही. त्यांनी या विषयावर आपली क्रांतिकारक मते मांडली आहेत. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे फडणवीस बोलू लागले आहेत. फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत. शब्द द्यायचा व नंतर वेळ येताच मोडायचा हे भाजपलाच चांगले जमते. 2014 आणि 2019 साली महाराष्ट्रात जे शब्द फिरवण्याचे खेळ झाले, त्याचा अनुभव गाठीशी असलेले फडणवीस इतरांच्या शब्दमोडीवर प्रश्न विचारतात हे आश्चर्यच आहे". असा टोला सामनातून फडणवीस यांना लगावण्यात आला आहे.

"फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही"

"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत भाजप नेतृत्वाने दिलेला शब्द कसा मोडला हे संपूर्ण देश जाणतो. पंचवीस वर्षांच्या युतीनंतरही शब्द मोडणाऱयांनी याबाबत प्रवचने झोडावीत यास काय म्हणायचे! कोंडी झाली म्हणजे काय हे आधी फडणवीस यांनी ‘मराठी शब्दरत्नाकरा’चा अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. 2019 साली ‘‘मी पुन्हा येईन’’ असे सांगणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून सुरू झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही".

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
यापुढे महाराष्ट्रात भाजपचं सरकार कधीच येणार नाही; संजय राऊतांचं वक्तव्य

"अफझलखानाने प्रतापगडावर शिवरायांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी अफझलखानाच्या पोटातच वाघनखे खुपसून कोंडी फोडली. पन्हाळगडाला मोगलांनी वेढा घालून महाराजांची कोंडी केली, पण महाराज कोंडी फोडून बाहेर पडले. औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारातही महाराजांची कोंडी झाली. महाराज ती कोंडी फोडून पेटाऱयातून निसटले. त्यामुळे फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे कोंडी झाली ती कशी हे समजायला मार्ग नाही". असंही सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप"

“संभाजी छत्रपती यांना दिलेला शब्द मोडला. हा शब्द वगैरे देताना फडणवीस तेथे हजर नव्हते. शिवसेना व संभाजीराजे यांच्यात जे घडले ते चार भिंतींतले आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढवणार आहे व संभाजीराजांनी अपक्ष न लढता शिवसेनेचा उमेदवार व्हावे एवढ्यापुरतीच ही चर्चा मर्यादित आहे. दोघांत राजकीय व्यवहार जमला नाही, मग तो भाजपाशी तरी जमला का? शरद पवार यांनी आधी संभाजीराजांना पाठिंब्यासाठी घोषणा केली आणि नंतर त्यांनी घूमजाव करत पाठिंबा काढून घेतला असे फडणवीस सांगतात. ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे,” असा टोलाही शिवसेनेनं लगावलाय.

"राज ठाकरेंची कोंडीही भाजपानेच केली"

“राज ठाकरे यांच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली. पुढे त्यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तेजन देऊन पुन्हा आपल्याच खासदाराकडून जोरदार विरोध करायला लावला व एकप्रकारे मोठी कोंडीच निर्माण केली. हाच त्यांचा राजकीय पॅटर्न असतो. शिवसेना असे कधीच करत नाही. जे करायचे ते समोर, बोलायचे तोंडावर. त्यामुळे सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंची कोंडी केली हे फडणवीसांचे वक्तव्य फसले आहे,” असही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut
गाव उजळायला गेला अन् कुटुंबावर अंधार पडला; विजेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू

"फडणवीस यांचीच कोंडी झाली"

"भाजपाला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी आहे; पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द दिसतात. संभाजीराजे प्रकरणात ते पुन्हा दिसले. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देणे हे घाणेरडे राजकारण आहे. महाराष्ट्राच्या मातीतले निर्मळ मन, सचोटी व मोकळेपणाचा शेवट हे लोक करू पाहत आहेत. त्यांना राज्याचा सामाजिक सलोखा मसणवटीत घालायचा आहे, पण कोल्हापूरच्या मातीतले सत्य अद्याप मेले नाही व छत्रपती शाहू घराण्याची सचोटी संपली नाही हे आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीच दाखवून दिले".

"फालतू राजकारण करणाऱ्यांचे कान छत्रपती शाहू महाराजांनीच टोचले. कोल्हापूरच्या राजवाड्यात पत्रकारांना बोलावून त्यांनी सांगितले, राज्यसभेच्या जागेचा जो प्रकार झाला, त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा सदैव मान राखला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला असे वाटत नाही. हे सर्व भाजपावाल्यांचेच घाणेरडे राजकारण चालले आहे. असे परखड मत छत्रपती शाहूंनीच मांडल्यावर फडणवीस यांचीच कोंडी झालेली दिसते. फडणवीस यांनी संभाजी छत्रपती प्रकरणात उडी घेतली, पण उडी फसली हे स्पष्ट झाले,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com