सातारा विकास आघाडीने (साविआ) विलंब केल्यामुळे सातारकरांना पाणी मिळण्यास उशीर झाला अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale latest marathi news) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्या आघाडीवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्या हस्ते आज कासच्या पाणी योजनेचे (kass pani yojna) ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी साविआवर निशाणा साधला. (Maharashtra News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरातून (pm modi in solapur) सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणी योजनेचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले, नगरविकास आघाडीचे प्रमुख आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी अभिजीत बापट, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भाेसले यांनी सातारा शहरासह त्रिशंकू भागाला पाणी पुरवठा कासच्या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. मात्र मूळची शहापूर, कण्हेर योजना पर्यायी ठेवायला लागतील. त्यामुळे 4.5 कोटीची विजेची बचत होणार आहे. ही याेजना 27 किलोमीटरची जलवाहिनी आहे. सुमारे 103 कोटींची कासची पाणी योजना आम्ही करणार आहोत. सर्वांच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करू शकलो यांचे समाधान असल्याचे उदयनराजेंनी म्हटले.
शिवेंद्रसिंहराजेंची 'साविआ'वर टीका
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले सत्तेत असणाऱ्या त्यांच्या सातारा विकास आघाडीवर टीका केली. ही योजना पूर्ण करण्यासाठी सातारा विकास आघाडीने विलंब केल्यामुळे सातारकरांना पाणी मिळण्यास उशीर झाला असे शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले.
नगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या काळात हे काम पूर्ण झाले नाही. उलट नगरसेवक माजी झाल्यानंतर हे काम पूर्ण होतंय ही दुर्दैवी गोष्ट आहे अशी टीका आमदार भाेसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीवर केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.