Kalyan News : शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांकडून बेदम मारहाण; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Kalyan Shinde Group Worker beaten : शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणाच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात घडली.
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांकडून बेदम मारहाण; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल
Kalyan Shinde Group Worker beaten NewsSaam TV

अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण

दुचाकीच्या टायराखाली आलेला दगड उडून लागल्याने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणाच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात घडली. या मारहाणीत शिंदे गटाचे पदाधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांकडून बेदम मारहाण; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल
Pravara River : प्रवरा नदीत SDRF जवानांची बोट नेमकी कशामुळे बुडाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनेचा थरार

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सुयोग देसाई, असं मारहाण झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेनंतर कल्याण पूर्व मध्ये सुरू असलेली गुंडागर्दी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग देसाई हे कल्याण पूर्व परिसरात राहतात. बुधवारी रात्रीच्या सुमारास ते दुचाकीने खडेगोळवली परिसरातून जात होते . याच दरम्यान त्यांच्या दुचाकीच्या टायरखाली आलेला दगड उडून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला लागला. संतापलेल्या तरुणाने आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सुयोग यांची दुचाकी थांबवली.

यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाला. वाद इतका विकोपाला गेला, की तरुणांच्या टोळक्याने सुयोग देसाई यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुयोग गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मारहाणीनंतरचा सुयोग यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोळसेवाडी पोलीस तरुणांच्या टोळक्याचा शोध घेतला जात आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांकडून बेदम मारहाण; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल
Buldhana Accident: घरात बहिणीचे लग्नकार्य, जेवणाचे साहित्य आणताना भीषण अपघातात दोन भावांचा मृत्यू; गावावर शोककळा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com